आयडेंटीटी फाऊंडेशनाला बस भेट 

पुणे : शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या मुलांना त्यांच्या परिसरात जाऊन शिक्षण देणे. तसेच त्यांना महापालिकेच्या शाळेत प्रवेश मिळवून देऊन त्यांच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या आयडेंटीटी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेला टीयेटो कंपनीच्या वतीने बस भेट देण्यात आली. कंपनीला नुकतीच 50 वर्षे पूर्ण झाली असून कंपनीच्या सामाजिक दायित्त्व उपक्रमा अंतर्गत ही बस भेट देण्यात आली. टियेटोचे निलेश सहस्त्रबुद्धे, आयडेंटीटी फाऊंडेशनचे विश्‍वस्त सचिन कुलकर्णी, संगिता शिंदे तसेच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आयडेंटीटी फाऊंडेशनच्या वतीने नगर रस्ता परिसरात वस्त्यांमधील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोबाईल लर्निंग प्रकल्पाच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्यात प्रामुख्याने बस मध्ये विकसित करण्यात आलेल्या वर्गाच्या माध्यमातून शिक्षण, व्यक्तीमत्व विकास, तसेच खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. 2007 पासून संस्थेचा हा उपक्रम सुरू असून या कामाची दखल घेत टियेटो कडून ही बस भेट देण्यात आली आहे. त्या बस मधून संगणक प्रशिक्षणही दिले जाणार आहे. टीयेटोच्या मुख्यकार्यकारी अधिकारी किम्मो अलकियो यांनी संस्थेच्या या उपक्रमास देत, अशा उपक्रमासाठी टीयेटोच्या माध्यमातून समाजिक उपक्रमासाठी पुढाकार घेत असल्याचे सांगत संस्थेस शुभेच्छा दिल्या .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)