आयडीयाज, इन्फोसीस संघांची विजयी सलामी

15वी अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट स्पर्धा 

पुणे: आयडीयाज्‌ अ सास कंपनी संघाने कॅपजेमिनि संघाचा तर इन्फोसीस संघाने सनगार्ड संघाचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली.

-Ads-

व्हिजन क्रिकेट अकादमीच्या मौदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात परेश दहिवाळच्या जलद 60 धावांच्या बळावर आयडीयाज्‌ अ सास कंपनी संघाने कॅपजेमिनि संघाचा 8 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आयडीयाज्‌ अ सास कंपनी संघाने 20 षटकांत 7 बाद 178 धावा केल्या. यावेळी पर्शने 36 चेंडूत 60 धावांची खेळी केली तर श्रीकांत जयरामनने 23, प्रसाद कुंटेने 21 व अरूण सिंगने 25 धावा करून त्याला सुरेख साथ दिली. 178 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमोल चौधरीच्या अचूक गोलंदाजीने कॅपजेमिनि संघाचा डाव 20 षटकांत 7 बाद 170 धावांत रोखला. यात संकेत देशपांडेने 45 धावा करून संघाचा डावाला आकार दिला. 60 धावा करणारा परेश सामनावीर ठरला.

तर, दुसऱ्या लढतीत प्रभज्योत मल्होत्राच्या 79 धावांच्या बळावर इन्फोसीस संघाने सनगार्ड संघाचा 85 धावांनी पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला. पहिल्यांदा खेळताना इन्फोसीस संघाने 20 षटकांत 6 बाद 192 धावांचा डोंगर उभा केला. यावेळी त्यांच्या प्रभज्योत मल्होत्राने 46 चेंडूत 79 धावा केल्या. तर, संजय पुरोहीतने 34 चेंडूत 47 धावा करून प्रभज्योतला सुरेख साथ दिली. यानंतर 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रवी थापलीयार व सागर दुबे यांच्या आक्रमक गोलंदाजूपुढे सनगार्ड संघ 19.2 षटकांत सर्वबाद 107 धावांच करु शकल्याने त्‌7यांना पराभूत व्हावे लागले.

स्पर्धेचे उद्घाटन आयडीयाज्‌ अ सास कंपनीचे संचालक प्रशांत केएस, आयडीयाज्‌ अ सास कंपनीचे माजी संचालक व उपाध्यक्ष राजीव नाशिककर, आयडीयाज्‌ अ सास कंपनीच्या फायनान्स्‌ हेड मल्लिका जेम्स्‌, अंकुर जोगळेकर मेमोरीअल फाऊंडेशनचे उपअध्यक्ष विजय जोगळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

सविस्तर निकाल –
साखळी फेरी – आयडीयाज्‌ अ सास कंपनी – 20 षटकांत 7 बाद 178 (परेश दहिवाल 60, श्रीकांत जयरामन 23, प्रसाद कुंटे 21, अरूण सिंग 25, विक्रांत बांगर 3-32) वि. वि कॅपजेमिनि- 20 षटकांत 7 बाद 170 (संकेत देशपांडे 45, फनिंद्र पायला 21, अंकुश महासाहेब 40, अमोल चौधरी 3-27)
इन्फोसीस- 20 षटकांत 6 बाद 192 (प्रभज्योत मल्होत्रा 79, संजय पुरोहीत 47, मेहबुब शेख 23, थॉमसन शोरॉन 24, सुमित चोपडे 2-28, पवन आनंद 2-33) वि.वि सनगार्ड- 19.2 षटकांत सर्वबाद 107 (पार्थ शर्मा 47, रवी थापलीयार 4-11, सागर दुबे 3-26).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)