आयडीयाज्‌ अ सास कंपनीची आगेकूच

15 वी अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतरआयटी क्रिकेट स्पर्धा

पुणे: आयडीयाज्‌ अ सास कंपनी संघाने बीएमसी सॉफ्टवेअर संघाचा तर सिमेंस संघाने सिनेक्रोन संघाचा पराभव करत येथे सुरू असलेल्या आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लिजेंड्‌स क्रिकेट अकादमी मौदानावर झालेल्या सामन्यात आयडीयाज्‌ अ सास कंपनी प्रसाद कुंटेच्या नाबाद 49 धावांच्या बळावर आयडीयाज्‌ अ सास कंपनी संघाने बीएमसी सॉफ्टवेअर संघाचा 18 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना आयडीयाज्‌ अ सास कंपनी 20 षटकात 5 बाद 150 धावा केल्या. यात अरुण सिंगने 34 व निहार जाशीने 25 धावा करून प्रसादला सुरेख साथ दिली. 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तुषार महामुनी व विजय सिंघल यांच्या अचूक गोलंदाजीपुढे बीएमसी सॉफ्टवेअर संघ 20 षटकात 8 बाद 132 धावांत गारद झाला. 33 चेंडूत 49 धावा करणारा प्रसाद कुंटे सामनावीर ठरला. तर, दुसऱ्या लढतीत हिमांशू अग्रवालच्या जलद अर्धशतकी खेळीच्या जोरावर सिमेंस संघाने सिनेक्रोन संघाचा 7 गडी राखून दणदणीत पराभव केला.

साखळी फेरी – आयडीयाज्‌ अ सास कंपनी – 20 षटकांत 5 बाद 150 (अरुण सिंग 34, निहार जोशी 25, प्रसाद कुंटे नाबाद 49, किरण कुडलिंगर 2-20, विवेक कांचन 2-25) वि.वि बीएमसी सॉफ्टवेअर- 20 षटकांत 8 बाद 132 (धिरज धुत 62, किरण कुडलिंगर 28, तुषार महामुनी 2-22, विजय सिंघल 2-16) सामनावीर- प्रसाद कुंटे. सिनेक्रोन- 20 षटकांत 7 बाद 145 (सौरभ सिंग 63, हार्दिक कोरी 31, मनोज भागवत 2-17) पराभूत वि सिमेंस- 17.4 षटकांत 3 बाद 146 (तुषार अत्तरडे 25, हिमांशू अग्रवाल 58, सौम्य मोहंती नाबाद 32, कार्तिक हिरपारा 1-25) सामनावीर- हिमांशू अग्रवाल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)