आयडीयाची कल्पना दोन आठवड्यातच फोल

आळंदी- इंद्रायणी नदीपात्रतील जलपर्णी रोखण्यासाठी सुमारे अडीच लाख रूपये खर्चून बांधलेले प्लॅस्टिकचे ड्रम अखेर रविवारी (दि.22) दुपारी वायर तुटल्याने सुटे झाले आणि जलपर्णी पाणीपुरठ्याच्या बंधाऱ्यात येवून अडकली. यामुळे पालिकेने खर्च केलेले लाखो रूपयांची “आयडीयाची कल्पना’ अवघ्या दोन आठवड्यातच वाया गेली आणि संपूर्ण पात्र पुन्हा जलपर्णीमय झाले आहे.

पिंपरी महापालिकेच्या सांडपाण्यामुळे आळंदीत जलपर्णीची बेसुमार वाढ झाली. पिंपरी महापालिका हद्दीतील चिखली, कुदळवाडी भागातून सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. यामुळे आळंदी शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे.कधी पाणी पिवळे तर कधी हिरवेगार तर कधी काळपट रंगाचे पाणी बंद नळाद्वारे येत. यामुळे आळंदीकरांचे आरोग्य धोक्‍यात आले. तर जलपर्णी बेसुमार वाढल्याने मासेही मृत होण्याचे प्रमाण वाढले. यावर उपाय म्हणून ही जलपर्णी रोखण्यासाठी आळंदी पालिकेने पाणी पुरवठ्याच्या बंधाऱ्यात गेली दोन आठवड्यांपूर्वी प्लॅस्टिकचे ड्रम वायरच्या साहाय्याने पाण्यात बांधून जलपर्णी आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. यासाठी पालिकेला सुमारे अडीच लाख रूपये खर्च आला असून इतरांनाही जलपर्णी रोखण्यासाठी पथदर्शी प्रयोग असल्याचे मुख्याधिकारी समिर भूमकर यांनी सांगितले होते. मात्र पालिकेचा हा प्रयोग अवघ्या दोन आठवड्यातच निष्काम ठरला. ड्रमला लावलेली वायर तुटली आणि एकेक ड्रम सुटे होत गेले. परिणामी ड्रमच्या आड अडकलेली सर्व जलपर्णी आळंदीला पाणीपुरवठा करणाऱ्या इंद्रायणीतील बंधाऱ्या लगत येवून अडकली. सध्या जलपर्णी वाळली असून पाणे पिवळी झाली तर काही ठिकाणी हिरवीगार जलपर्णी असल्याचे दिसून येत आहे. याबाबत पाणीपुरवठा विभाग प्रमुख दत्तात्रेय सोनटक्के यांनी याबाबत मुख्याधिकारी भूमकर यांना अहवाल कळविला असून तातडीने पुन्हा दुरूस्ती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)