आयडीबीआय घोटाळा प्रकरणी शेअर बाजाराच्या प्रमुखांवर गुन्हा

नवी दिल्ली : एअरसेलचे माजी प्रवर्तक सी. शिवशंकरन यांनी आयडीबीआय बँकेत केलेल्या ६00 कोटींच्या कर्ज घोटाळ्यात मुंबई शेअर बाजाराचे (बीएसई) चेअरमन एस. रवी व बँक आॅफ बडोदाचे माजी व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) पी. एस. शेणॉय यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा नोंदवला आहे.

एस. रवी हे आयडीबीआय बँकेचे स्वतंत्र संचालक व लेखा परीक्षण समितीचे चेअरमन आहेत. तसेच शेणॉय हे कर्ज मंजूर झाले होते, तेव्हा आयडीबीआय बँकेचे स्वतंत्र संचालक होते. आयडीबीआयने शिवशंकरन यांना दोन कर्जे दिली असून, ती देताना नियम धाब्यावर बसवण्यात आले होते, असे चौकशीतून उघड झाले आहे.

एस. रवी, शेणॉय, रेगो, खरात व राघवन यांची लवकरच चौकशी केली जाणार आहे. तत्पूर्वी, सीबीआयने आयडीबीआय बँकेच्या सहा अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर धाडी टाकल्या होत्या. यात अमिता नारायण , आर.के. बन्सल, एस.के. श्रीनिवासन, आर.एस. विद्यासागर, भारत पाल सिंग , मेधा जोशी यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)