आयडीबीआयच्या फसवणुकीबद्दल 31 जणांविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली – आयडीबीआय बॅंकेची तब्बल 445 कोटी रूपयांची फसवणूक केल्याबद्दल सीबीआयने 31 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये बॅंकेचे माजी महाव्यवस्थापक बट्टू रामाराव यांचा समावेश आहे. राव यांच्याशी संगनमत करून 220 जणांनी कर्ज घेतले. त्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि मत्स्यशेती कर्जासाठीच्या तरतुदींचा गैरवापर करण्यात आला. कर्ज घेण्यासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेण्यात आला. हे कर्ज नंतर बुडित ठरले. विशिष्ट कारणांसाठी कर्जाची रक्कम न वापरता व्यक्तिगत कारणांसाठी वापरण्यात आल्याचेही याप्रकरणी उघड झाले. हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी यांच्याशी संबंधित पीएनबी घोटाळा उघड झाल्यानंतर विविध बॅंकांना कर्जाच्या रूपाने चुना लावण्यात आल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)