नवी दिल्ली: आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडियाच्या विलीनीकरणामुळे या क्षेत्रात सुधारणा होण्यास मदत होईल असे या क्षेत्रातील जाणकारांना वाटते. विलीनीकरणानंतर तयार झालेली नवी कंपनी भारतातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी बनली आहे. दोन्ही कंपन्यांनी एक संयुक्त निवेदन जारी करून विलीनीकरणाची माहिती दिली. व्होडाफोन-आयडिया लि. असे नव्या कंपनीचे नाव असून, कंपनीचे 408 दशलक्ष ग्राहक आहेत. नव्या कंपनीसाठी 12 सदस्यांचे संचालक मंडळ स्थापन केले आहे. त्यात 6 स्वतंत्र संचालक आहेत. कुमारमंगलम बिर्ला हे नव्या कंपनीचे चेअरमन आहेत. संचालक मंडळाने लगेचच कारभार सुरू केला असून, बालेश शर्मा यांची सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही कंपन्या एकत्र करण्यात आल्या असल्या तरी व्होडाफोन आणि आयडिया हे ब्रॅंड कायम राहतील. दोघांचा मिळून 32.2 टक्के बाजार हिस्सा कंपनीकडे असेल. देशातील नऊ दूरसंचार मंडळांत कंपनी सर्वोच्च स्थानी राहील. सध्या भारती एअरटेल ही कंपनी पहिल्या स्थानी होती, तिच्या स्थानाला आता धक्‍का लागणार आहे. 30 जून 2018 रोजीच्या स्थितीनुसार, कंपनीचे कर्ज 1,09,200 कोटी रुपये आहे. विलीनीकरण शुल्कापोटी कंपनीने दूरसंचार विभागास 3,900 कोटी रुपये दिले असून, त्यानंतर कंपनीकडे 19,300 कोटी रुपयांची रोख शिल्लक आहे. जिओ आल्यानंतर दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)