आयडिया-व्होडाफोन विलीनीकरण लवकरच

नवी दिल्ली -व्होडाफोन-आणि आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण मंजूरीच्या अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी येथे दिली. या विलीनीकरणास कंपनी राष्ट्रीय कायदा लवाद (एनसीएलटी) व सेबीने आधीच मान्यता दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.

देशात 5 जी मोबाइल सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियाच्या (कोआई) वतीने येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
सूत्रांनी सांगितले की, विलीनीकरणानंतर तयार होणाऱ्या नव्या कंपनीसाठी व्होडाफोन व आयडियाने गेल्याचआठवड्यात समितीची घोषणा केली. कुमार मंगलम बिर्ला हे अ-कार्यकारी चेअरमन, तर बालेश शर्मा सीईओ असतील. विलीनीकृत कंपनी ग्राहक आणि महसूलाच्या दृष्टीने भारतातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी ठरणार आहे. जूनअखेरपर्यंत हे विलीनीकरण पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)