आयडिया-व्होडाफोनचे विलिनीकरणाच मान्यता

40 कोटी ग्राहकांना देणार सेवा
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आयडिया आणि व्होडाफोन यांच्या विलिनीकरणला आज आयडीयाच्या बोर्डाने मान्यता दिली. या विलिनीकरणारमुळे तयार होणारी नवी कंपनी जवळपास 40 कोटी ग्राहकांना सेवा पुरवणार आहे. सेबी आणि रिझर्व्ह बॅंकेची परवानगी मिळाल्यावर दोन्ही कंपन्या एकत्र होणार आहेत. व्होडाफोन मोबाईल सर्व्हिसेस लिमिटेडचे वार्षिक उत्पन्न 40 हजार 378 कोटी रुपये आहे. तर आयडिया सेल्युलरचे उत्पन्न 36 हजार कोटी रुपये आहे. व्होडाफोनकडे सध्या एकूण ग्राहकांपैकी 18.36 टक्के ग्राहक आहेत. तर आयडीयाचा मार्केट शेअर 16 टक्के आहे. सध्या सर्वाधिक संख्या एअरटेलकडे असून जवळपास 24 टक्के ग्राहक एअरटेलची सेवा घेतात. आता व्होडाफोन आणि आयडिया एकत्र झाल्यावर जवळपास 34 टक्के ग्राहक एकाच कंपनीचे होणार आहेत. गेल्यावर्षी जिओच्या माध्यमातून टेलिकॉम क्षेत्रात पुनरागमन करताना रिलायन्स समूहाने सहा महिन्यांहून अधिक काळ ग्राहकांना मोफत सुविधा दिली आहे. आता एक एप्रिलपासून जिओसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. पण या निमित्ताने पुन्हा एकदा ग्राहक टिकवण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा रंगणार आहे. दरम्यान या विलीनीकरणानंतरही व्होडाफोन आणि आयडीया असे दोन ऑपरेटर बाजरात कायम राहतील असे कंपनीने कंपनीने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)