आयडियल हॅण्डलूम एक्स्पोला ग्राहकांचा प्रतिसाद

सातारा ःआयडियल हॅण्डलूम एक्स्पोला ग्राहकांची झालेली गर्दी

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) -आयडियल इव्हेंट मॅनेजमेंट ग्रुप प्रस्तुत हॅण्डलूम एक्स्पो या प्रदर्शनास कोटेश्वर मैदान येथे ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या एक्स्पोमध्ये डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास पाच टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे.
या प्रदर्शनात कलात्मक हस्तकला, हस्ती शिल्प, हॅण्डलूम हॅण्डिक्राफ्ट व कंजूमर वस्तुंचे प्रदर्शन व विक्री एकाच छताखाली सुरू आहे. येथे 20 हजारापेक्षा अधिक उत्पादने आहेत. प्रदर्शनात ओरिसा पेटिंग, राजस्थानी ब्लॉक प्रिंट, ड्रेस मटेरिअल, व जरीवर्क वस्तू, लखनवी चिकन साड्या, ड्रेस मटेरिअल, ब्लू ऑर्ट पॉटरी, मध्यप्रदेश, अ‍ॅनिमल टॉईज, बंगाली कांथा साडी, पंजाबी फुलकारी ड्रेस मटेरियल, ओरिसा हॅण्डलूम हॅण्डिक्राफ्ट, राजस्थानी बांगड्या, दागिने, कारपेटस्, सिल्क साडी, राजस्थानी बेडशिट, बेड कव्हर, ब्लॉक प्रिंट, ड्रेस मटेरिअल, यु. पी. सिल्क, वूलन कारपेटस्, दिल्ली फॅन्सी एम्ब्रायडरी सुट्स, शांती निकेतन बॅग व ज्युट बॅग व चप्पल, लेझर पर्स, खुर्जो क्रॉकरी, सहारनपूर फॅन्सी व अँटिक फर्निचर, टेराकोट इमिटेशन ज्वेलरी, प्रिंटेड सिल्क साडी व मार्बल इत्यादींचा समावेश आहे. दि. 9 ऑगस्टपासून सुरू झालेले हे प्रदर्शन 7 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 11 ते 9 या वेळेत सुरू राहणार आहे. ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक गजानन गोसावी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)