“आयडियल किड्‌स’कडून मुलींसाठी शैक्षणिक सवलत

फलटण – स्त्री शिक्षणाचे प्रणेते, थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतिदिनी त्यांच्या महान कार्याच्या विचारांचा वारसा पुढे चालविणाऱ्या फलटण येथील आयडियल किड्‌ड्‌स इंटरनॅशनल स्कूल च्या संस्थापक अध्यक्षा सौ.वैशाली शिंदे यांनी आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींसाठी शैक्षणिक शुल्कामध्ये 20 % सवलत जाहिर केली. तसेच मुलींचा जन्मदर वाढवा, स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी जनजागृतीचे व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्याचे असल्याचे सौ.वैशाली शिंदे यांनी संगीतले.

ज्याप्रमाणे फुले दांपत्यानी जुन्या बुरसटलेल्या सामाजिक प्रथांचा विरोध करून मुलींसाठी शैक्षणिक कवाडे उघडली.माणुसकी हाच धर्म आणी उपेक्षित समाजाला मदत हे तत्व सर्व जगाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पटवून दिले. आपले संपूर्ण आयुष्य वेचून गोरगरीब विद्यार्थीनाकमवा आणी शिका या योजनेद्वारे जगण्याचा मंत्र कर्मवीर आण्णानी दिला. समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांच्यासाठी वस्तीगृहे बांधून राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व जगापुढे आदर्श ठेवला. या थोर विभूतींच्या विचारांनी प्रेरीत होऊन समाजविधायक कार्य पार पाडण्यासाठी मुलगी शिकली प्रगती झाली हे ब्रीद वाक्‍य अनुसरले आहे आणी याचाच भाग म्हणून मुलींच्या शैक्षणीक शुल्कात सवलत जाहीर केल्याचेही सौ.शिंदे यांनी स्पष्ट केले.

शाळेतील नव्या शिक्षणासाठी आतुरलेली मने,मुलींच्या जन्माने नाराज झालेली मने, किंवा मुलींच्या एकूणच भवितव्याची चिंता बाळगणारी मने या सर्वांचा सारासार विचार करून आयडियल किड्‌ड्‌स मध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींना शैक्षणीक शुल्कातील सवलतीबरोबरच स्वसंरक्षणासाठी कराटे, डिजिटल युगासाठी कॉमप्यूटर, मैदानी खेळ, स्पोकन इंग्लिश, फोनिक इंग्लिश, शास्त्रीय नृत्य आणी संगीतअसे विविध पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)