आयटी पार्कमधील अभियंत्याकडून बेकायदा गावठी पिस्तूल जप्त

पिंपरी – शहरातील मोशी प्राधिकरण येथील एका मेकॅनिकल इंजिनियरच्या घरातून सात पिस्तूल आणि 15 जिवंत काडतुसे जप्त केल्याची घटना ताजी असताना हिंजवडी पोलिसांनी हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या एका लीड इंजिनियरच्या कार्यालयातील टेबलच्या ड्रॉवरमधून एक गावठी पिस्तुल जप्त केले आहे. ही कारवाई ऍपलटन बिझनेस ग्रुप या कंपनीत करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडीतील ऍपलटन बिझनेस ग्रुप या कंपनीत एका इंजिनियरकडे पिस्तूल आहे, अशी माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली होती. पोलिसांनी तातडीने ऍपलटन बिझनेस ग्रुप या कंपनीत धाड टाकली. त्यांनी कंपनीची झडती घेतली असता कंपनीच्या एका लीड इंजिनियरच्या कार्यालयातील टेबलच्या ड्रॉवरमधून 15 हजारांचे एक गावठी पिस्तूल पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले. मात्र कोणी व का हे पिस्तूल तेथे ठेवले त्या इंजिनियरला अडकवायचे होते का अशा विविध अंगाने पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)