आयटीबीपी जवानांना वाढदिवशी पुष्पगुच्छ, केक आणि अर्धा दिवस सुटी 

नवी दिल्ली: आयटीबीपी (इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस) च्या जवानांना आता वाढदिवशी पुष्पगुच्छ, केक आणि अर्धा दिवस सुटी देण्यात येणार आहे. वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीला पुरुष वा महिला त्या दिवशी लष्करी गणवेषा ऐवजी त्याच्या/तिच्या आवडीचा पोषाख घालता येणार आहे. आपल्या घरादारापासून दीर्घकाळ दूर राहणाऱ्या जवानांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 90 हजारापेक्षा अधिक संख्याबळ्‌ असणाऱ्या आयटीबीपीत नुकतीच या उपक्रमास सुरुवात करण्यात आली.
पतियाळा येथे तैनात 51व्या बटालियनच्या कमांडिंग ऑफिसरने जारी केलेल्या आदेशानुसार वाढदिवस असलेल्या जवानाचे नाव युनिटच्या नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात येणार आहे. अशा जवानाचे ज्येष्ठ अधिकारी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील, त्याच्या हस्ते वाढदिवसाचा केके कापंण्यात येईल आणि युनिट त्याचा वाढदिवस साजरा करील. त्या दिवशी खास नाष्टा देण्यात येणार आहे. शिवाय काही अत्यंत महत्त्वाची कामगिरी नसेल्‌, तर त्याला अर्धा दिवस सुटी देण्यात येईल.
वाढदिवसासारखा आनंद वाटॄन घेतल्याने वाढतो.
कोणाचाही वाढदिवस साजरा करणे चुकता कामा नये,असा आदेशच आयटीबीपीच्या अरुणाचल प्रदेशातील लोहित जिल्ह्यातील पशू-वाहतूक विभागाच्या प्रमुखांनी-डीआयजी सुधाकर नटराजन यांनी जारी केला आहे. जर जवान रजेवर असेल वा अत्यंत महत्त्वाच्या कामगिरीसाठी नियुक्त असेल तरच त्याचा अपवाद होऊ शकेल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आलेले आहे. आपल्या मुलांना अर्धसिनिक दलात पाठवणाऱ्या पालकांनाही वैयक्तिक धन्यवाद देणारा संदेश पाठवण्याची प्रथा नटराजन यांनी सुरू केली आहे. भारत आणि चीन यांच्यातील 3,488 किमी लांबीच्या सीमेचे रक्षण आयटीबीपी करत असते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)