पिंपरी – आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 21) रात्री दहाच्या सुमारास मारुंजी येथे घडली.

पूजा नागनाथ वाघमारे (वय-23, रा. मारुंजी, ता. मुळशी, मुळगाव – सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा हिंजवडी येथील एका आयटी कंपनीत काम करीत होती. तिने सोमवारी मारुंजी येथील राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत मारुंजी परिसरातील रहिवासी सुनील अंकुश जाधव यांनी हिंजवडी पोलिसांना खबर दिली. हिंजवडी पोलिसांनी पूजाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)