आयटीत कंपनीत दोन महिलांचा विनयभंग

येरवडा येथील घटना, सिक्‍युरीटी इंचार्जसह सफाई कर्मचारी अटकेत

येरवडा – आयटीींपनी मधील दोन महिला कर्मचाऱ्यांची कंपनीतील कर्मचाऱ्याने विनयभंग करण्याच्या दोन घटना येरवड्यात घडल्या. यामधील एका घटनेत बडीकॉंप हेल्पलाईनच्या मदतीने सौरभ राजू विटकर (वय 21, रा. शिवाजीनगर, पुणे) या साफसफाई कर्मचाऱ्याला, तर सुशिलकुमार सिंग (वय 40, रा.नवी खडकी, येरवडा) या सिक्‍युरीटी इंचार्जला येरवडा पोलिसांनी अटक केली.
पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार येरवडा येथील दोन वेगवेगळ्या आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या दोन महिलांना कामाच्या ठिकाणी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्णन करणाऱ्या दोघांविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलीस आयुक्त रश्‍मि शुक्‍ला यांच्या संकल्पनेतून आयटी कंपनीमधील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी बडीकॉंप योजना येरवड्यासह विविध पोलीस स्टेशनमध्ये राबविण्यात येत आहे. यातील एचएसबीसी कंपनीत महिलांच्या स्वच्छता गृहात डोकावणाऱ्या साफसफाई कर्मचारी सौरभ विटकर याला कंपनीतील महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरुन बडीकॉप योजनेतून तत्काळ अटक करण्यात आली.
दुसऱ्या घटनेत सुशिलकुमार सिंग हा कॉमरझोन आयटी कंपनीतील सिक्‍युरीटी इंचार्ज सुरक्षारक्षक महिला कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणे, धमकावणे असे प्रकार वांरवांर करीत होता. रात्रपाळीवरील महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडण्याचा बहाणा करणाऱ्या सिंगविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असून अधिक तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)