आयटीआय निदेशकांचे आज मुंबईत धरणे 

मुंबई – राज्यभरातील आयटीआय निदेशकांच्या संघटनेने आपल्या विविध मागण्यासाठी उद्या मंगळवारी आझाद मैदानावर धरणे आंदोलन आयोजित केले आहे. कौशल्य विकासाच्या कामात आयटीआय विभाग महत्वाचे योगदान देत असताना या विभागाच्या मागण्यांकडे सरकारने साफ दुर्लक्ष केले आहे असा संघटनेचा आरोप आहे.

विविध कोर्सेसच्या प्रशिक्षणासाठी आवश्‍यक असलेल्या पदांच्या 50 टक्के पदे त्वरीत भरण्यात यावीत, डीजेईट मानकानुसार हत्यारे, यंत्रसामग्री या करीता पुरेसा निधी त्वरीत द्यावा, संस्थेतील स्वच्छतेसाठी सफाई कामगार, वसतीगृह अधिक्षक रखवालदार इत्यादींची नेमणूक त्वरीत करण्यात यावी, अस्थायी निदेशकांना स्थायी करताना त्यांच्या नियुक्तीपासून त्यांना सेवाज्येष्ठता देण्यात यावी, सन 2005 नंतरच्या सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, इत्यादी मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन होणार आहे.

-Ads-

महाराष्ट्र आयटीआय संघटनेचे निदेशक अध्यक्ष महादेव माळी, व भोजराज काळे, विनोद दुर्गपुरोहित यांनी या आंदोलनाची हाक दिली आहे, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे असे संघटनेचे पदाधिकारी प्रमोद दहिवडे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)