आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धा; रित्सावर दित्या जैनची सनसनाटी मात

पुणे – दित्या जैन हिने मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवताना आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेतील 10 वर्षांखालील मुलींच्या गटात आगेकूच केली. पीएमडीटीए यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
आरसीबीसी टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील 10 वर्षांखालील मुलींच्या एकेरीतील पहिल्या फेरीत दित्या जैन हिने तिसऱ्या मानांकित रित्सा कोंडकरचा 5-0 असा एकतर्फी पराभव अनपेक्षित निकाल नोंदविला. तसेच याच गटातील आणखी एका सामन्यात प्रिशा शिंदेने शौर्या सूर्यवंशीचा टायब्रेकमध्ये 5-4 (7-5) असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

दहा वर्षांखालील मुलांच्या एकेरीतील तिसऱ्या फेरीत अव्वल मानांकित कार्तिक शेवाळे याने आदित्य योगीचा 5-0 असा पराभव केला. तर अनिकेत रॉयने रियान पापलचा 5-2 असा सहज पराभव करताना आगेकूच केली. आणखी एका लढतीत आठव्या मानांकित सूर्या काकडेने यश अत्रेला 5-1 असे नमविले.

-Ads-

आठ वर्षांखालील मिश्र गटातील पहिल्या फेरीत पुरणराज कोतवालने सृष्टी सूर्यवंशीचा 5-1 असा सहज पराभव केला. तर सहाव्या मानांकित दक्ष पाटीलने सानिका खुराणाचा 5-1 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली.

सविस्तर निकाल –

आठ वर्षांखालील मिश्र गट – पहिली फेरी – पुरणराज कोतवाल वि.वि. सृष्टी सूर्यवंशी 5-1; दक्ष पाटील (6) वि.वि. सानिका खुराणा 5-1; क्षितिज अमीन वि.वि. वीरा हरपुडे 5-3; शौर्य घोडके (4) वि.वि. स्वानिका रॉय 5-0; जय शहा वि.वि. अगस्त्या भामिदीप्ती 5-3; नीरज जोरवेकर (5) वि.वि. रिषिक ठाकूर 5-0; विरण चौधरी वि.वि. काव्या पांडे 5-2; सिद्धांत कुमार (7) वि.वि. मेनूहा दिनेश 5-1;

दहा वर्षांखालील मुले – तिसरी फेरी – कार्तिक शेवाळे (1) वि.वि. आदित्य योगी 5-0; अनिकेत रॉय वि.वि. रियान पापल 5-2; शार्दूल खवले (14) वि.वि. जय दर्डा 5-0; अमोघ दामले वि.वि. श्रीराम जोशी 5-0; अमन शहा (5) वि.वि. विराज बर्वे 5-1; सूर्या काकडे (8) वि.वि. यश अत्रे 5-1;

दहा वर्षांखालील मुली – पहिली फेरी – गौतमी बराटे वि.वि. कोमल व्ही 5-0; दित्या जैन वि.वि. रित्सा कोंडकर (3) 5-0; आदिती सागवेकर वि.वि.आरोही देशमुख 5-0; मिहिका संधू वि.वि. करीश कट्टट 5-0; प्रिशा शिंदे वि.वि. शौर्या सूर्यवंशी 5-4(7-5); वैष्णवी सिंग वि.वि. ध्रुवी आद्यंथया 5-1.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)