आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धा : आदित्य योगी, रिशिता पाटील, तेज ओक यांचा मानांकित खेळाडूंना धक्‍का 

पुणे – आदित्य योगी, रिशिता पाटील, तेज ओक या खेळाडूंनी आपापल्या गटांतील मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्‍का देताना चौथ्या आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत सनसनाटी निकालाची नोंद केली.
पीएमडीटीए यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आरपीटीए टेनिस कोर्ट,पाषाण येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील 8 वर्षांखालील मिश्र गटाच्या दुसऱ्या फेरीत रिशिता पाटीलने तिसऱ्या मानांकित नीरज जोर्वेकरचा 5-3 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. अन्य लढतीत अव्वल मानांकित नमिश हूडने पृथ्वीराज दुधानेचा 5-3 असा पराभव केला. तसेच आदित्य योगीने सहाव्या मानांकित आयुश पाटीलवर टायब्रेकरमध्ये 5-4 (6) अशी मात केली.

दहा वर्षांखालील मुलींच्या गटात वैष्णवी सिंग व रित्सा कोंडकर यांनी अनुक्रमे अनिष्का सुंदराम व नैशा कपूर यांचा 5-2 अशा सारख्याच फरकाने पराभव करून आगेकूच केली. तर दुसऱ्या मानांकित प्रिशा शिंदेने इरा कुंभारचे आव्हान 5-1 असे मोडीत काढले. तसेच प्रेक्षा प्रांजल, काम्या चोपडा व काव्या देशमुख या बिगरमानांकितांनीही आगेकूच कायम राखली. दहा वर्षांखालील मुलांच्या गटात बिगरमानांकित तेज ओक याने दुसऱ्या मानांकित अर्चित धूतचा 5-1 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. मात्र अग्रमानांकित सक्षम भन्साळी, तृतीय मानांकित अवनीश चाफळे, चतुर्थ मानांकित पृथ्वीराज हिरेमठ आणि पाचवा मानांकित समीहन देशमुख या मानांकितांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारताना आगेकूच केली.

-Ads-

सविस्तर निकाल – 
आठ वर्षांखालील मिश्र गट – दुसरी फेरी – नमिश हूड (1) वि.वि. पृथ्वीराज दुधाने 5-3; रित्सा कोंडकर (4) पुढे चाल वि. स्वस्ती अगरवाल; विहान पटनी वि.वि. राम मगदूम 5-4 (5); आदित्य योगी वि.वि. आयुश पाटील (6) 5-4 (6); अमीन क्षितिज (7) वि.वि. श्रेय भूतरा 5-2; रिशिता पाटील वि.वि. नीरज जोर्वेकर (3) 5-3; सुजय देशमुख (5) वि.वि. प्रज्ञेश शेळके 5-4 (4); आर्यन कीर्तने (2) वि.वि. मिहिर काळे 1-0 (सामना सोडून दिला),
10 वर्षांखालील मुली- दुसरी फेरी – वैष्णवी सिंग वि.वि. अनिष्का सुंदरम 5-2; रित्सा कोंडकर (4) वि.वि. नैशा कपूर 5-2; प्रेक्षा प्रांजल वि.वि. साची मुंदडा 5-1; काम्या चोपडा वि.वि. सैशा शिंदे 5-0; काव्या देशमुख वि.वि. ईश्वरी पंडित 5-2; प्रिशा शिंदे (2) वि.वि. इरा कुंभार 5-1;

10 वर्षांखालील मुले- दुसरी फेरी – सक्षम भन्साळी (1) वि.वि. वर्धन पोतदार 5-0; नील केळकर वि.वि. मल्हार देशपांडे 5-0; अनुज भागवत वि.वि. शुभंकर सिन्हा 5-3; नमिश हूड (7) वि.वि. वेद मोघे 5-3; अवनीश चाफळे (3) वि.वि. प्रज्ञेश शेळके 5-0; रोहन बजाज वि.वि. आरिन गद्रे 5-3; शिवांश कुमार वि.वि. वैष्णव दानावडे 5-0; समीहन देशमुख (5) वि.वि. आदित्य कामत 5-3; अमन शहा वि.वि. विश्वजीत सणस 5-0; विहान तिवारी वि.वि. रियान माळी 5-2; पृथ्वीराज हिरेमठ (4) वि.वि. पृथ्वीराज दुधाने 5-2; कार्तिक शेवाळे (6) वि.वि. सुजय देशमुख 5-0; सनत कडाळे वि.वि. शौनक रणपिसे 5-0; श्रीराम जोशी वि.वि. ओंकार किंकर 5-1; तेज ओक वि.वि. अर्चित धूत (2) 5-1.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)