“आयकॉन’मध्ये पाच मतदान केंद्र

जिल्हाधिकारी यांच्या मनधरणीचा आणि चूक सावरण्याचा प्रयत्न

नगर – जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना अरेरावी करून त्यांच्या पथकाला स्कूलमधून हाकलून देणाऱ्या “आयकॉन’च्या संचालकांनी महापालिकेच्या मतदान केंद्रासाठी जागा दिली आहे. महापालिका प्रशासनाने देखील या स्कूलमध्ये सुमारे पाच मतदान केंद्र निश्‍चित केली आहे. “आयकॉन’च्या प्राचार्यांनी जिल्हाधिकारी व त्यांच्या पथकाला दिलेल्या वागणुकीच्या दुरूस्तीसाठी हा खटाटोप केल्याचे कारण यामागे देण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि महापालिकेच्या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निर्णय अधिकारी स्टेशन रस्त्यावरील “आयकॉन’ स्कूलमध्ये मतदान केंद्र उभारता येतील का, याची पाहणी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी केले होते. “आयकॉन’च्या प्राचार्यांनी मात्र जिल्हाधिकारी द्विवेदी यांना तिथे अपमानास्पद वागणूक दिली. स्कूलच्या आवारात न विचारता का पाय ठेवला, अशी विचारणा केली. द्विवेदी यांनी स्कूलचे प्राचार्य राणा यांच्यात यावरून चांगलीच खडाजंगी झाली.

हा अपमान झाल्याने जिल्हाधिकारी आणि त्यांचे पथक तेथून निघून आले. परंतु द्विवेदी यांच्या सूचनेवरून कोतवाली पोलीस ठाण्यात “आयकॉन’च्या प्राचार्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद अदखलपात्र अशी केली आहे. या गुन्ह्याची फिर्याद होण्याऐवजी फक्त अदखलपात्र नोंद झाल्याची शहरात चर्चा होती.

दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी “आयकॉन’च्या स्कूलच्या इमारतीच्या बांधकामाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. महापालिका अधिकायांनी देखील तत्काळ चौकशी सुरू केली आहे. या चौकशीच्या प्राथमिक तपासणीत स्कूलच्या इमारतीविषयी अनेक कंगोरे समोर आले आहेत. परंतु त्यावर जाहीर भाष्य करण्यात महापालिका अधिकारी तयार नाहीत. जिल्हाधिकारी द्विवेदी यांची मनधरणीसाठी आता स्कूलच्या व्यवस्थापनाने प्रयत्न सुरू केले आहे. कोणत्याही कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून न देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या स्कूलने आता महापालिकेच्या सार्वजनिक मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्र उभारण्यास परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे, यासाठी स्कूलच्या व्यवस्थापकांनीच पुढाकार घेतल्याची चर्चा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)