आयकर विवरण भरण्याची मुदत 15 ऑक्‍टोबरपर्यंत वाढवली

नवी दिल्ली – आयकर विवरण दाखल करण्यासाठी केंद्र सरकारने 15 ऑक्‍टोबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. ज्या करदात्यांचे लेखा परीक्षण होणे बाकी आहे, अशा सर्व संबंधित करदात्यांच्या प्रतिनिधींनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे याबाबतची मागणी केली होती. त्यानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

आयकर विवरण दाखल करण्याबरोबरच आर्थिक वर्ष 2017- 18 साठीचे लेखापरीक्षण अहवाल दाखल करण्यासाठीही ही मुदतवाढ दिली गेली आहे. यासाठी 30 सप्टेंबर 2018 ही विवरण आणि लेखा परीक्षण अहवाल सादर करण्यासाठीची अंतिम मुदत निश्‍चित करण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, प्राप्तीकर कायदा 1961 च्या 234 अ या कलमांतर्गत कर भरणाऱ्यांसाठी मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत कर न भरल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होऊ शकते, असे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)