आयकर विभागाचे तामिळनाडूत छापे 

चेन्नई: तामिळनाडूतील अवैध खाणकाम प्रकरणातील मुख्य आरोपी ए वईकुंदराजन यांच्या व्ही व्ही मिनरल्स या कंपनीवर आज आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकून कारवाई केली आहे. त्याचबरोबर राज्यातील वईकुंदराजन यांच्या 100 वेगवेगळ्या ठिकाणांवरही तपास सुरु आहे. वईकुंदराजनवर मोठ्या प्रमाणावर अवैध खाणकाम केल्याचा आरोप आहे. त्याची कंपनी व्ही व्ही मिनरल्स गार्नेट, इल्मेनाइट आणि रुटाइल सारख्या दुर्मीळ खनिजांचा देशातील सर्वांत मोठा निर्यातदार आहे.

देशातील खनिज बीच मिनरल्समधील एकूण 64 परवान्यांपैकी 45 परवाने वुईकुंदराजन यांच्या कुटुंबीयांकडे आहेत. यातील बहुतांश त्याच्या भावाकडे आहेत. वईकुंदराजन यांच्याविरोधात 200 फौजदारी खटले आणि किमान 150 दिवाणी खटले सुरु आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)