आयकर रिटर्न 29 आणि 31 मार्चला देखील भरता येणार कारण….

नवी दिल्ली : आयकर रिटर्न भरण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागता नये यासाठी 29 आणि 31 मार्च रोजी आयकर कार्यालये आणि आयकर सेवा केंद्रे सुरू राहतील असे सरकारकडून सांगण्यात आले. 29 मार्च रोजी महावीर जयंती, 30 मार्चला गुड फ्रायडे आणि 31 मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे.

29 आणि 31 मार्च रोजी सरकारी सुटी जाहीर करण्यात आली होती. 2016-17 साठी प्राप्तिकर भरण्यासाठी 31 मार्च हा शेवटचा दिवस असून 2017-18 साठी  नियमित रिटर्नसाठीचा शेवटचा दिवस आहे. आयकर रिटर्न भरणे आणि त्यासंबंधित कामे पूर्ण करण्यासाठी देशातील आयकर विभागाची केंद्रे सुरू राहतील. 29 आणि 30 मार्च रोजी बँका बंद राहणार आहेत, तर 31 मार्च रोजी बँका सुरू राहतील. शनिवारी पूर्णवेळ शाखा सुरू ठेवण्याचा काही बँकांनी निर्णय घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)