आयओसी कंपनीचा विस्तारीकरणावर भर

  ऊर्जेचा वापर आगामी काळात वाढणार असल्यामुळे कंपन्यांकडून तयारी

नवी दिल्ली- भारताची इंधनविषयक गरज ध्यानात घेत खनिज इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने 23,000 कोटींच्या गुंतवणुकीचा आराखडा तयार केला आहे. येत्या 1 एप्रिल 2018 पासून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुंतवणुकीच्या खर्चात वाढ करण्यात आली आहे. कंपनी ही गुंतवणूक मुख्यत: कंपनीच्या क्षमतेचा विस्तार आणि आधुनिकीकरणावर करण्यात येणार आहे. त्याखेरीज विपणन यंत्रणेला अधिक सक्षम करण्याचे उद्दिष्ट कंपनीसमोर आहे. गुंतवणुकीसाठी लागणाऱ्या भांडवलाची उभारणी कर्जातून किंवा रोख्यांच्या माध्यमातून करण्याचा कंपनीचा विचार नाही.

कंपनीच्या उत्पन्नातूनच ही गुंतवणूक करण्याचा इंडियन ऑईल कॉर्पोरेशनची योजना आहे. आर्थिकदृष्ट्या कंपनी सुस्थितीत असून कंपनीच्या पूर्व विभागाच्या कामगिरीत सुधारणा झाल्यामुळे यावर्षी त्या विभागाकडून चांगल्या नफ्याची अपेक्षा असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. भारत सध्या जगातल्या सर्वाधिक ऊर्जेचा वापर करणाऱ्या देशांपैकी एक देश आहे. भारताची खनिज तेलाची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

त्यामुळेच इंडियन ऑईल कॉर्पोरेशनसारख्या खनिज तेल शुद्धीकरण कंपनीला स्पर्धेतील स्वत:चे स्थान टिकवण्यासाठी आपल्या क्षमतांचा विस्तार करणे गरजेचे आहे. भारतातल्या खनिज तेल शुद्धीकरणात इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचा वाटा 35 टक्‍के आहे.

तर पेट्रोलियम उत्पादनांच्या बाबतीत इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचा भारतीय बाजारपेठेतला हिस्सा 45 टक्‍के आहे. या कंपनीला गेल्या काही वर्षापासून खाजगी कंपन्याकडून मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. देशातील खासगी कंपन्यांनी गेल्या तीन वर्षांत भारतीय बाजारपेठेतला आपला खप तिपटीने वाढवला आहे. त्यामुळेच आगामी काळात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचे दिसून येते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)