लंडन (ब्रिटन): ब्रिटनसाठी आयएस आणि अल कायदा यांच्यापेक्षाही रशियाकडून अधिक आहे. ब्रिटनचे लष्कर प्रमुख जनरल मार्क कार्लटन-स्मिथ यांनी एका मुलाखतीत हे स्पष्ट करतानाच रशियाने आपल्या लष्करी सामर्थ्याचा वापर पश्चिमी देशांच्या कमजोरीचा फायदा उठवण्यापेक्षा आपल्या राष्ट्रीय हितासाठी करावा अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.
आजच्या घडीला रशिया पाश्चिमी देशांना संत्रस्त करण्याचा सुनियोजित प्रयत्न करत असून त्यासाठी सायबर हल्ले करणे, अंतरिक्षात बाधा निर्माण करणे आणि सागरी युद्धाचे हातकंडे अजमावून पाहत आहे. सध्या ब्रिटन आणि रशियाचे संबंध अत्यंत बिघडलेले आहेत. मार्च महिन्यात रशिया आणि ब्रिटन अशा दोन्ही देशांसाठी डबल एजंटची भूमिका निभावणाऱ्या सर्गेई स्क्रिपल्स आणि त्याच्या मुलीला मारण्यासाठी सेल्सबरी शहरात रासायनिक हल्ला करण्यात आला होता.
या हल्ल्यासाठी ब्रिटनने रशियाला जबाबदार धरून रशियाच्या ब्रिटनमधील अनेक राजकीय प्रतिनिधींची हकालपट्टी केली होती. प्रत्युत्तरादाखल रशियानेही ब्रिटिश प्रतिनिधींची रशियातून हकालपट्टी केली आहे. इराक आणि सीरियामध्ये आयएसला पराभूत केल्यानंतर पश्चिमी देश आणि नाटोची नजर आता रशियावर आहे, असे जनरल मार्क कार्लटन-स्मिथ यांनी सांगितले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा