आयएसआयच्या कारवाया उघड करणारे पाकिस्तानी न्यायाधीश बरखास्त 

इस्लामाबाद (पाकिस्तान): आयएसआयच्या कारवाया उघड करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पाकिस्तानने तडकाफडकी बरखास्त केले आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे एक ज्येष्ठ न्यायाधीश शौकत अजीझ सिद्दिकी यांच्यावर आयएसआयच्या कारवाया उघड केल्याबद्दल ही गदा कोसळली आहे.पुढील महिन्यातच त्यांची इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती होणार होती, मात्र बढती ऐवजी त्यांना मिळाली आहे बडतर्फी!

न्यायाधीश सिद्दिकी यांना बरखास्त करण्याचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. ही कारवाई एका समितीच्य शिफारशीवरून करण्यात आलेली आहे. आयएसआय निवडणुकीपूर्वी कायदेकानूसंबंधी बाबतीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यांनी वकिलांच्या एका कार्यक्रमात केला होता. नवाज शरीफ आणि त्यांची कन्या मरीयम यांना निवड्‌णुकीपूर्वी मुक्त करू नये असे आयएसआयने म्हटल्याचे त्यांनी उघड केले होते. 13 जुलै रोजी नवाज शरीफ आणि मरीयम या दोघांनाही लंडनमध्ये आलिशान फ्लॅट खरेदीप्रकरणी अटक करण्यात आलेली होती.

-Ads-

निवडणुकीत गडबड्‌ होणार असून आयएसआय आणि इम्रान खान यांचे साटेलोटे असल्याचा आरोप माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन ने केला होता. त्यांच्या म्हणण्याला सिद्दिकी यांच्या वक्तव्याने पुष्टी मिळाली होती. एकूणच पाकिस्तानमध्ये कोणीही आयएसआयच्या विरोधात ब्र ही काढू शकत नाही, ही गोष्ट न्यायमूर्ती सिद्दिकी यांच्या बरखास्तीने आणख़ी एकदा अधोरेखित झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)