आयएसआयच्या आदेशाने 3 एसपीओजची हत्या आणि भारत – पाक चर्चा रद्द

नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान यांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये अमेरिकेत चर्चा होण्याचे ठरले होते, मात्र भारताने ही चर्चा अचानक रद्द करण्याचा निर्णय घेतला, यामागचे कारण आता उघड झाले आहे. ज्या दिवशी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचे भारत-पाक चर्चेसाठीचे पत्र सार्वजनिक झाले, त्याच दिवशी काश्‍मीरमध्ये तीन एसपीओजची दहशतवाद्यांनी हत्या केली. या हत्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाले आहे.

भारतीय गुप्तचर संस्थेने आयएसआयचे फोन कॉल इंटरसेप्ट केले. फोनवरील या संदेशात आयएसाआयने दहशतवाद्यांना पोलीस अधिकाऱ्यांना ठार मारण्याच्या सूचना दिल्या होत्या. या संदेशांत मारल्या गेलेल्या तीन एसपीओजची-एसपीओ निसार अहमद खान, एसपीओ फिरदौर अहमद आणि कुलवंत सिंह यंची नावेही घेण्यात आलेली आहेत.

-Ads-

म्हणजे एकीकडे शंतिवार्ता करण्यासाठी पत्र पाठवायचे आणि दुसरीकडे दहशतवादाला मदत करायची ही पाकिस्तानची मुख में राम बगल में छुरी ही चाल जुनीच असल्याने अमेरिकेत दोन देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा तडकाफडकी रद्द करण्यात आली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)