आयएल ऍण्ड एफएसच्या पतमानांकनात घट 

मुंबई: आयएल ऍण्ड एफएस या पायाभूत सुविधासाठी कर्ज पुरविणाऱ्या कंपनीचे प्रश्‍न वाढत चालले आहेत. आता या कंपनीची शाखा असलेल्या आयएल ऍण्ड एफएस पर्यावरण पायाभूत सुविधा आणि सेवा ( आयईआयएसएल) या कंपनीचे पतमानांकन इंडिया रेटींग या संस्थेने कमी केले आहे. त्याचबरोबर कंपनीच्या इतर कामकाजाच्या कार्यक्षमतेवर शंका व्यक्‍त करण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्यातच ईक्रा या संस्थेने या कंपनीच्या सर्व शाखांचे पतमूल्यांकन कमी केले आहे.
आयएल ऍण्ड एफएस कंपनीने काही देणी दिलेली नाहीत. त्यामुळे शेअरबाजारावर गेल्या काही दिवसापासून परिणाम होत आहे. या कंपनीवर तब्बल 91 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे आता या कंपनीला भांडवल उभारण्यात मोठ्या अडचणी येण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जात आहे.
आता कंपनी 8 हजार कोटी रुपयाचे भांडवल उभा करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी कंपनीने आपले मुख्यालय विकायला काढले आहे. या कंपनीच्या अनुषंगाने शेअरबाजारात मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. या घडामोडीकडे आमचे लक्ष असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने आणि व सेबीने सांगितले आहे. त्याचबरोबर अर्थमंत्रालयानेही आमचे बाजारातील घडामोडीकडे लक्ष असल्याचे सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्षात सरकारने याबाबात आणखी काहीही केलेले नाही. त्यामुळे भांडवल सुलभता कमी होईल या शंकेने गुंतवणूकदार शेअरबाजारातून नफा काढून घेत असल्याचे वातावरण शेअरबाजारात आहे
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)