आयएल अँड एफएस म्हणजे धोक्याची घंटा (भाग-२)

आयएल अँड एफएस कंपनी आर्थिक संकटात सापडल्याने अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असून त्यातून सावरण्यासाठीचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. पायाभूत सुविधांवर देशात भर दिला जात असल्याने त्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीवर ही वेळ येणे, ही धोक्याची घंटा आहे.

आयएल अँड एफएस म्हणजे धोक्याची घंटा (भाग-१)

गेल्या चार वर्षात अशा एनबीएफसी कंपन्यांमध्ये म्युच्युअल फंडांनीसुद्धा मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. हा आकडा ३३ अब्ज डॉलरपर्यंत पोचला आहे. बाजारातील तज्ञांच्या मते, आयएल अँड एफएसवरील संकट सर्वांसाठीच धोक्याची घंटा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेअर बाजारातही या सर्वांचे पडसाद उमटत आहेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये दिवाण हाउसिंग फायनान्स, इंडिया बुल हाऊसिंग फायनान्स, येस बँक अशा वित्तीय क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच आयएल अँड एफएस कंपनीचे चेअरमन रवी पार्थसारथी यांनी अचानक आरोग्याचे कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते या कंपनीमध्ये गेली तीस वर्षे अध्यक्ष होते. त्यानंतर इक्रा (आयसीआरए) या पतमानांकन करणाऱ्या संस्थेने आयएल अँड एफएस चे मानांकन AAA वरून कमी करून AA+ वर आणले. सप्टेंबर महिन्यात मल्टीपल टाईम्सवरून जंक स्टेटसवर मानांकन आले. जंक स्टेटस म्हणजे कंपनीत लोकांनी केलेली गुंतवणूक बुडीत खाती जाऊ शकते. तज्ञांच्या मते सरकारने या परिस्थितीत हस्तक्षेप करण्यास उशीर केला त्यामुळे सध्याची परिस्थिती निर्माण झाली. सरकारने राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे दाद मागितली. लवादाने परवानागी दिल्यावर सरकारने कंपनीचे व्यवस्थापन हाती घेतले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विट केले – आयएल अँड एफएसचे मूल्य आणि मालमत्ता जपण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी केल्या जातील.

सरकारने पूर्वीचे संचालक मंडळ बरखास्त करून नवीन संचालक मंडळ नेमले. त्यामध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गजांची नियुक्ती केली. श्री. उदय कोटक, मालिनीशंकर, विनित नय्यर, गिरीशचंद्र चतुर्वेदी, नंदकिशोर अशी नावाजलेली तज्ञ मंडळी संचालक मंडळावर आली आहेत.

कंपनीसाठी नवीन गुंतवणूक उभी करणे, सुरु असणारे प्रकल्प थांबणार नाहीत हे पाहणे, झालेल्या गैरव्यवहारांची सखोल चौकशी करणे, लोकांची गुंतवणूक परत करण्यासंदर्भात पुन्हा नव्याने नियोजन करणे, रोख्यांची तरलता पुन्हा निर्माण करणे अशा अनेक आव्हानात्मक बाबींवर नव्या संचालकांना काम करणे अपेक्षित आहे. सध्याची परिस्थिती खूपच गुंतागुंतीची आहे. पारदर्शक कारभार करून सर्व काही सुस्थितीत आणणे हे मोठे आव्हान नवीन संचालक मंडळासमोर आहे. संचालक मंडळ त्यात यशस्वी होईल, अशी आशा करू यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)