आयएलएफएसला मदतीची सरकारची तयारी : गडकरी 

मुंबई: आयएलएफएसचे रेंगाळलेले पायाभूत सुविधा प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी आवश्‍यक ती मदत करण्याची सरकारची तयारी आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, पायाभूत सुविधा वाढविण्याची मोहीम सरकारने हाती घेतली आहे. यात खंड पडू दिला जाणार नाही. नियमांतर्गत सरकार आयएलएफएसला काय मदत करू शकते, हे नव्या संचालक मंडळाने आम्हाला सांगावे. त्यावर गंभीरपणे विचार केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)