आयएलएफएसची पाठराखण का?  राहुल गांधी यांचा पंतप्रधानांना सवाल 

नवी दिल्ली: राफेल विमान खरेदी करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने निशाणा साधणाऱ्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. एलआयसीचे पैसे देऊन आयएलएफएस (ILFS) कंपनीची पंतप्रधान मोदी हे पाठराखण का करत आहे, असा सवाल राहुल गांधींनी ट्‌विटरवरून विचारला आहे. यामागील सत्य हे जनतेसमोर आले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी आज ट्विटरवर एक ट्विट केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. इन्फ्रास्ट्रक्‍चर लीजिंग अँड फायनेंशियल सर्विसेज (IL&FS) ही कंपनी पंतप्रधान मोदी यांची आवडती कंपनी आहे. ती वाचावीसाठी मोदींनी सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा टाकला आहे. तसेच एलआयसीचे हफ्ते भरणाऱ्या लोकांच्या पैशांतून फसवणूक करणाऱ्या लोकांना वाचवण्याचे काम करण्यात येत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
गुजरातचे 2007 सालीचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी IL&FS कंपनीला 70 हजार कोटी रुपयांचा एक प्रकल्प मंजूर केला होता. या प्रोजेक्‍टमध्ये पुढे कोणतेही काम झाले नाही, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
एलआयसी, एसबीआय आणि सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया या सरकारी संस्थांचे IL&FS कंपनीत 40 टक्के शेअर आहेत. जर 40 टक्के शेअर सरकारी संस्थांचे आहेत तर या कंपनीवर 91 हजार कोटींचे कर्ज कसे काय झाले?, असा सवाल कॉंग्रेसने उपस्थित केला आहे.
पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आणि अर्थ मंत्रालय हे रिझर्व्ह बॅंक, स्टेट बॅंक, एलआयसी आणि एनएचआयवर दबाव टाकत आहे, असा आरोप कॉंग्रेसकडून केला जात आहे. कंपनीत 5 टक्के शेअर विदेशी कंपनीचे आहेत. त्यामुळे या कंपनीला बेलआउट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या कंपन्यांना वाचवण्यासाठीच सरकारचे सर्व प्रयत्न सुरू आहेत, असा आरोपही राहुल गांधींनी केला आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)