आयएमएकडून जेष्ठ नागरिकांसाठी परिषदेचे आयोजन

पुणे,दि.12 – जेष्ठ नागरिकांना येणाऱ्या आरोग्य विषयक समस्या, मानसिक ताणतणाव, अडचणी, बदलत्या हवामानाचा त्यांच्यावर होणारा परिणाम आदी सर्व विषयांबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जेष्ठ नागरिकांसाठी जेरीकॉन या परिषदेचे आयोजन केले आहे.
याबाबची माहिती देण्यासाठी आएमएकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.राजकुमार शहा, डॉ.ंबी.एल.देशमुख, डॉ.संजय पाटील, डॉ.आरती निमकर आणि डॉ.मीनाक्षी देशपांडे उपस्थित होते. या परिषदेतमध्ये राज्यांतील तज्ज्ञ डॉक्‍टर मार्गदर्शन करणार असून 14 ते 15 जुलै दरम्यान ही वैद्यकीय परिषद टिळक स्मारक मंदिरात पार पडणार आहे अशी माहिती आयएमए पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ.पदमा अय्यर यांनी दिली. या परिषदेत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणीकृत एक हजार पेक्षा जास्त डॉक्‍टर्स सहभागी होणार आहेत. याबरोबरच सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी 14 जुलै रोजी सायंकाळी सहा ते आठ यावेळेत टिळक स्मारक मंदिरात वृध्दत्वातील समस्या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. मनोविकार तज्ज्ञ डॉ.विद्याधर वाटवे, वृध्दांच्या मानसिक समस्या: आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.दिलीप देवधर आनंदी वृध्दत्व याविषयावर बोलणार आहेत. ग्राहक पेठेचे संचालक सुर्यकांत परिसंवादाचे अध्यक्षस्थान भुषविणार आहेत. याबरोबरच रविवारी (15) विठ्‌ठ्‌ल काटे, डॉ.सुरेश गोखले, यांचा कार्यक्रम होणार असून शनिवारी दुपारी चार ते सहा आणि रविवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वेळेत सर्वांसाठी हाडांच्या ठिसुळपणाची व रक्‍तातील साखरेची मोफत तपासणी केली जाणार असल्याचे असोशिएशनचे संयोजक अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)