आयएमईडीच्या प्लेसमेंटला प्रतिसाद

पुणे – भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ऍण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंटच्या (आयएमईडी) प्लेसमेंटला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या प्लेसमेंट उपक्रमात 95 हून अधिक विविध कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला.

यामध्ये गुगल, ऍमेझॉन, रिलायन्स इंडस्ट्रीज, आय.टी.सी., आदित्य बिर्ला, आयसीआयसीआय सिक्‍युरिटीज, विप्रो, टेक महिंद्रा, बजाज अलियान्स, मोतीलाल ओसवाल आदी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत.

या शैक्षणिक वर्षात आयएमईडीचे 160 हुन अधिक विद्यार्थी संस्थेच्या “कार्पोरेट रिसोर्स सेल’मधून विविध कंपन्यांमध्ये नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर 48 लाख, देशपातळीवर 10 ते 12 लाखांचे पॅकेज मिळाले आहे, अशी माहिती आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी दिली. उच्चशिक्षणाला पोषक वातावरण, उत्तम शिक्षणपद्धती, उच्चशिक्षित शिक्षकवर्ग व विद्यार्थी हा केंद्रबिंदू असल्यामुळे या प्लेसमेंटला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)