आयएनएसव्ही ‘तारिणी’ लवकरच भारतीय नौदलात

नवी दिल्ली – भारतीय नौदलाची आयएनएसव्ही ‘तारिणी’ ही दुसरी शीडनौका उद्या आयएनएस मांडोवी येथे नौदलप्रमुख सुनील लांबा यांच्या उपस्थितीत नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहे.
आयएनएसव्ही तारिणीमधून सर्व भारतीय महिला खलाशी असणारा नौदलाचा पहिला चमू जागतिक सागरपरिक्रमेवर रवाना होणार आहे. तारिणीवर सहा शिडे असून तिची डोलकाठी 25 मीटर उंच आहे. या नौकेवर अद्ययावत संपर्क सुविधा बसवण्यात आली असून याद्वारे जगात कुठेही संपर्क स्थापित करता येतो.
या नौकेचे नाव ओदिशातल्या गंजाम जिल्ह्यातल्या विख्यात तारा-तारिणी देवालयाच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. संस्कृतमध्ये तारिणी या शब्दाचा अर्थ नौका असा असून तारा-तारिणी ही खलाशी आणि व्यापाऱ्यांची आश्रय देवता आहे. लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी या नौकेच्या कप्तान असून लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट ऐश्वर्या बोडापती, लेफ्टनंट परापल्ली स्वाती, लेफ्टनंट विजया देवी, लेफ्टनंट पायल गुप्ता हा चमू यातून सागर परिक्रमा करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)