“आयएएस, आयपीएस’ला गुणवत्तेशिवाय पर्याय नाही

राजगुरूनगर- “आयएएस, आयपीएस’ अधिकारी होणे ही मोठी शीडी आहे. ती पादाक्रांत करण्यासाठी कष्ट, आत्मविश्‍वास आणि जिद्द महत्त्वाची आहे. गुणवत्तेला पर्याय नसल्याने परीक्षर्थीनी मेहनत केली पाहिजे, असे प्रतिपादन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी राजगुरुनगर येथे केले.
खेड तालुका पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात स्वर्गीय बाळासाहेब आपटे स्मृती अभ्यासिकामध्ये यूपीएससी एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या मुलांना स्वर्गीय शांताराम भोंडवे यांच्या स्मरणार्थ आयएएस अधिकारी संकेत भोंडवे यांच्यावतीने मार्गदर्शक पुस्तक प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी पाटील बोलत होते. यावेळी राजमार्ग मंत्रालयाचे उपसचिव संकेत भोंडवे, सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, संतोष हिंगे, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, अमोल पवार, किरण आहेर, सुरेखा टोपे, समीर थिगळे, सतीश चांभारे यांच्यासह विविध क्षेत्रातील अधिकारी सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात यूपीएससी एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तालुक्‍यातील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संकेत भोंडवे म्हणाले की, युवकांना पुढे जाण्यासाठी खूप क्षेत्र आहेत. आजच्या काळात यूपीएससी एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी सर्व साधने उपलब्ध आहेत तिचा उपयोग केला पाहिजे. याबरोबर उत्तम आरोग्य ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आरोग्य उत्तम असेल तर सर्व गोष्टींचा सामना करायला सोपे जाते, उठा जागे व्हा आपले स्वप्न पूर्ण करा, असे आवाहन केले त्यांनी केले.
आयुष प्रसाद म्हणाले की, स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अगोदर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सगळ्या परीक्षा सारख्याच आहेत फक्‍त जिद्द आणि आत्मविश्‍वास महत्त्वाचा आहे. त्याजोरावर कोणत्याही क्षेत्रात यश मिळते. यूपीएससी एमपीएससीच्या अभ्यास करताना घाबरून न जाता आत्मविश्‍वासाने पुढे जायला पाहिजे असे सांगून स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचा मूलमंत्र सांगितला. यावेळी प्रमुख पाहुण्याचा परिचय करताना जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी केला.
पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन कैलास मुसळे, सुदाम कराळे यांनी तर आभार राजेंद्र सांडभोर यांनी मानले.

  • राज्यात सर्वाधिक वाहूतककोंडी राजगुरुनगर येथे होते. ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करून बाह्यवळण रस्त्याचे काम मार्गी लावण्यात येईल.
    – संकेत भोंडवे, उपसचिव, राजमार्ग मंत्रालय 
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)