आयएएस अधिकाऱ्याची अडीच कोटींची मालमत्ता जप्त

पाटणा – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बिहार केडरच्या आयएएस अधिकाऱ्याची अडीच कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली. के.सेंथिलकुमार असे जप्तीच्या कारवाईला सामोऱ्या जाव्या लागलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. बिहारमध्ये मुंगेरचे जिल्हाधिकारी आणि पाटणा पालिकेचे आयुक्त असताना कुमार यांनी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप आहे.

कुमार यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत पाटण्यातील सदनिका, काही प्लॉट आणि बॅंक खात्यामंधील रकमेचा समावेश आहे. कुमार सध्या बिहारच्या कामगार खात्यात रोजगार आणि प्रशिक्षण विभागात संचालक म्हणून कार्यरत आहेत. ईडीने महिनाभराच्या कालावधीत बिहारमधील दुसऱ्या आयएएस अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. याआधी संथाल परगण्याचे आयुक्त प्रदीप कुमार यांची सुमारे 2 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)