आयआरसीटीसी घोटाळा राबडी, तेजस्वी यांना जामीन

नवी दिल्ली – रेल्वेच्या आयआरसीटीसी गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाने आज बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि राजद नेते तेजस्वी यादव यांना जामीन मंजुर केला. हा जामीन 19 नोव्हेंबर पर्यंत वैध असेल.

त्या दिवशी तेजस्वी यादव यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे कोर्टापुढे हजर राहावे अशी सूचना कोर्टाने त्यांना केली. या दोघांनाही एक लाख रूपयांचा जामीन कोर्टाने मंजुर केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 नोव्हेंबरला होणार असून त्या दिवशी सर्व आरोपींनी कोर्टात हजर राहावे अशी सुचना कोटाने केली आहे. स्वत: लालूप्रसाद यादव हेही या खटल्यात आरोपी आहेत पण ते आजच्या सुनावणीला हजर राहु शकले नाहीत कारण ते झारखंडच्या कारागृहात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)