“आयआयएमएस’मध्ये इंडक्‍शन उत्साहात

चिंचवड : "आयएएमएस'मध्ये "इंडक्‍शन' सोहळा उत्साहात संपन्न झाला.
  • “यशस्वी’चा उपक्रमः विद्यार्थ्यांना एमबीएचे मार्गदर्शन

पिंपरी, (प्रतिनिधी) – चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स अर्थात “आयएएमएस’मध्ये “इंडक्‍शन’ सोहळा उत्साहात संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष 2017 साठी एमबीए अभ्यासक्रमाकरिता 9 ते 11 ऑगस्ट दरम्यान “यशोप्रवेश’ हा तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला होता.

इंडक्‍शन सोहळाचे समारोप सत्रात ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ञ कॅप्टन डॉ. सी. एम. चितळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, एमबीएचे शिक्षण घेत असतानाच उद्योगजगतातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवा, जबाबदारीने आणि गंभीरपूर्वक अभ्यास करा, तसेच शिक्षण संपल्यानंतर सुरु होणाऱ्या करिअरचे आतापासूनच ध्येय निश्‍चित करा. याशिवाय स्वतःला रोजगारक्षम बनविण्यासाठी उत्तम संवाद कौशल्य आणि सादरीकरण कौशल्य अंगीकृत करा.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या संचालक प्रा. भाग्यश्री कुंटे यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहल, दीपक, सुदीती, विशाखा या विद्यार्थ्यानी केले. तर, आभार प्रा. अमर गुप्ता यांनी मानले. या कार्यक्रमासाठी आशा महाजन, मुक्त केसकर, सोनाली पाटील, दीप्ती लेले, आदिती चिपळूणकर, पवन शर्मा, संदीप गेजगे आदींनी विशेष सहकार्य केले.

विद्यार्थ्यांनी नैपुण्य संपादन करावे…
डेस्टिक इन्फो सोल्युशन्स प्रा.लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार लांडे यांनी स्वतःच्या स्टार्ट अप उद्योग व्यवसायाची माहिती सांगत विद्यर्थ्यांना उद्योजकीय मानसिकता याविषयी विविध उदाहरणांसह मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांसोबत परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध नामांकीत कंपन्यांमधील तज्ञ व्यक्तींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच नवनवीन रोजगार संधी प्राप्त करण्यासाठी संवाद कौशल्य, नेतृत्वगुण यासह मार्केटिंग, फायनान्स व एचआर यापैकी ज्या क्षेत्रात भविष्यात काम करणार असाल, त्यातील एखाद्या क्षेत्रात नैपुण्य विद्यार्थीदशेतच संपादन करणे फायदेशीर ठरेल, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)