‘आम्ही सारे खवय्ये’ कार्यक्रमात नवरात्री विशेष भागात नायिकांची रेलचेल

सण समारंभ म्हटलं की घरामध्ये रेलचेल असते ती विविध पाककृती बनविण्याची. गोडधोड पदार्थ, चमचमीत, खमंग, खुसखुशीत पदार्थ बनविण्याची लगबग घराघरांत बघायला मिळते. यातही प्रत्येक सणाला काही तरी वेगळं आणि खास बनविण्याची इच्छा घरातील सुगरणींना असते. पण या वेगळं काय करायचं? यासाठी त्या विविध माध्यमं शोधतअसतात. आता या सुगरणींच्या मदतीला येणार आहे झी मराठीच्या लोकप्रिय मालिकांमधील लाडक्या नायिका ‘आम्ही सारे खवय्ये’ कार्यक्रमाच्या माध्यमातून. नवरात्रीच्या सणाचं औचित्य साधून आम्ही सारे खवय्येच्या किचनमध्ये या नायिकांचा धमाल स्वयंपाक सोहळा रंगणार आहे.

झी मराठीच्या कुटुंबात नुकतीच सामील झालेली तुला पाहते रे मालिकेतील ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार घटस्थापनेच्या भागात सहभागी होणार आहे. तिच्या आयुष्याबद्दलचे अनेक पैलू अगदी दिलखुलास पणे मांडणार आहे. नवरात्री विशेषच्या दुसऱ्या भागात जागो मोहन प्यारे मधील भानू म्हणजेच श्रुती मराठे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.नवरात्री विशेष भागाची रंगत वाढवण्यासाठी तिसऱ्या भागात सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारी लागिरं झालं जी या मालिकेमधील अभिनेत्री शीतल म्हणजेच शिवानी बावकर येणार आहे. जर्मन भाषेतून प्रपोज करताना संकर्षण आणि शिवानी मध्ये नेमकी काय गंमत घडते हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आपल्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणाऱ्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमधील नवी शनाया म्हणजेच इशा केसकर देखील तिचं पाककला कौशल्य दाखवणार आहे. तसेच उत्तम खलनायिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली तुला पाहते रे मधील मायरा म्हणजेच अभिज्ञा भावे या विशेष भागात सहभागी होणार आहे. शास्त्रीय नृत्यांगना ते अभिनेत्री हा रंजक प्रवास आणि अनेक प्रेरणा देणारे किस्से बाजी या मालिकेमधील हिरा म्हणजेच नुपूर दैठणकर आम्ही सारे खवय्येच्या नवरात्री विशेष भागात सांगणार आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमधील राधिका म्हणजेच अनिता दाते आम्ही सारे खवय्येच्या कुटुंबात दसरा साजरा करणार आहे. इतकंच नव्हे तर या सर्व लाडक्या नायिकांनाआम्ही सारे खवय्येच्या किचनमध्ये एक सरप्राईज देखील मिळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)