आम्ही सत्तेवर आल्यावर राफेल गैरव्यवहारांची चौकशी करू -राहुल गांधी

दोषींना शिक्षा करू 

राफेल विमाने कतार आणि इजिप्तला स्वस्तात कशी मिळाली?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवरील राफेल गैरव्यवहाराच्या विषयावरील हल्ला सुरूच ठेवला आहे. त्यांनी म्हटले आहे की आम्ही केंद्रात सत्तेवर आल्यानंतर राफेल गैरव्यवहाराची चौकशी केली जाईल आणि त्यातील दोषींना शिक्षा केली जाईल. संसदे बाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. संरक्षण मंत्री आणि कायदा विभागाकडून राफेलच्या वाढीव किंमतींबाबत आक्षेप घेण्यात आलेला असताना सुद्धा मोदींनी तो आक्षेप धुडकाऊन राफेलचा करार केला आणि आपल्या कर्जबाजारी मित्राला अनिल अंबानी यांना या विमानांचे कंत्राट देऊन देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली असा आरोपही त्यांनी केला.

ते म्हणाले की राफेलवर संसदेत झालेल्या चर्चेतून पंतप्रधान मोदी पळून गेले आणि त्यांच्याऐवजी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लोकसभेत प्रदीर्घ उत्तर दिले. त्यांनी मला अपशब्द वापरले पण मी विचारलेल्या प्रश्‍नांना मात्र त्यांनी उत्तरे दिली नाहींत. सरकारवरील आपल्या आक्षेपांच्या संबंधात राहुल गांधी यांनी आपले प्रश्‍न आजही उपस्थित केले. ते म्हणाले की 526 कोटी रूपयांचे राफेल विमान 1670 कोटी रूपयांना घेण्याचा निर्णय कोणी घेतला? हवाईदलाला 126 विमानांची गरज असताना ती संख्या 36 वर कोणाच्या सांगण्यावरून आणण्यात आली आणि अनिल अंबानी यांना याचे कंत्राट कोणी दिले? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. या व्यवहारात भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी झाली पाहिजे या मागणीचा पुनरूच्चारही त्यांनी केला. याच संबंधात कॉंग्रेसतर्फे एक निवेदनही प्रसिद्धीला देण्यात आले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की कतार, इजिप्त या देशांनीही राफेलची विमाने भारतापेक्षा स्वस्तात खरेदी केली आहेत मग भारताने हीच विमाने महागड्या किंमतीत घेण्याची गरज का भासली याचा खुलासा सरकारने केला पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)