आम्ही लोकांच्या बाजूनेच! काँग्रेससारख्या पक्षाकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही- शिवसेना

मुंबई: पेट्रोल दरवाढीविरोधात नुकताच भारत बंद पाळण्यात आला. काँग्रेस व इतर पक्षांनी यामध्ये सहभाग घेतला होते. भारत बंद दरम्यान शिवसेना कुठेही दिसली नाही. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे होते.

मात्र, शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून पेट्रोल दरवाढीवरून भाजपाला सुनावले आहे ” सत्ताधाऱ्यांनी महागाईच्या झळा कशा विझतील, इंधन दरांचा भडका कसा शांत होईल हे पाहावे. ते करायचे सोडून त्यावरून हात कसले झटकताय? लोकांनी सत्ता मिळवून दिली ती काही अशा प्रश्नावरून हात झटकण्यासाठी नाही!, असे शिवसेनेने म्हटले आहे.

तसेच, शिवसेनेने काँग्रेसवर सुद्धा निशाणा साधला आहे. “काँग्रेस किंवा डाव्यांनी उमेदवार उभा केला नसता तर भंडारा-गोंदियाप्रमाणेच पालघरचा निकालही वेगळा लागला असता. आम्ही आमच्या ताकदीवर लढलो व भाजपास तसे लोळवलेच. काँग्रेस किंवा डाव्यांनी पाठिंबा दिला नाही म्हणून पराभवाचे खापर दुसऱ्यावर फोडले नाही. यालाच वाघाचे काळीज व मर्दाची लढाई म्हणतात. इंधन दरवाढीपासून अनेक प्रश्नांनी जनता त्रस्त आहे. आम्ही लोकांच्या बाजूनेच आहोत व त्यासाठी काँग्रेससारख्या पक्षाकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. ” असा पलटवार शिवसेनेने काँग्रेसवर केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)