आम्ही मोदींशी लढणार पण त्यांचा द्वेष नाहीं करणार ! – राहुल गांधी

राहुल गांधी यांचे ओडिशात प्रतिपादन

भुवनेश्‍वर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील आमची लढाई अत्यंत आक्रमक असेल, ते पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत हेही आम्ही पाहू पण हे करताना आम्ही मोदींचा द्वेष मात्र करीत नाही त्यांच्या विषयी आमच्या मनात द्वेष भावना असणार नाहीत असे प्रतिपादन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. ओडिशा डायलॉग या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते म्हणाले की मी जेव्हा मोदींकडे पहातो आणि जेव्हा ते मला शिव्याशाप देत असतात त्यावेळी मी त्यांना मिठी मारून त्यांच्यातील द्वेषभावना नाहीशी करता येईल का याचा विचार करतो. ते कॉंग्रेसवर नाराज असतील. मी ते समजू शकतो पण त्यांच्या विषयी माझ्या मनात कधीच संतापाची भावना निर्माण होत नाही किंवा आम्ही त्यांचा द्वेषही करीत नाही. हीच आमची संस्कृती आहे. आम्ही कोणालाही एकमेकांचा द्वेष करायला लावत नाही.

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून माझी झालेली थट्टा आणि त्यांनी मला घातलेल्या शिव्या ही माझ्यासाठी मोठी भेट आहे अशी टिपण्णीही त्यांनी केली. मोदींच्या सरकारवर आणि मंत्र्यांवर संघाचे पुर्ण नियंत्रण असून आपली विचारसरणी ते त्यांच्या माध्ममातून सरकारी प्रशासनात रूजवण्याचा प्रयत्न करीत आहेत असेही त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)