आम्ही दोघी मालिकेत देवाशिषमुळे येणार नवीन ट्विस्ट

नवे पर्व, युवा सर्व’ असं म्हणत झी युवा वाहिनीने वैविध्यपूर्ण मालिका सादर करून तमाम प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.

‘आम्ही दोघी’ ही मालिका झी युवा वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली. आम्ही दोघी मालिकेचं कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तरलहान बहीण मधुरा खोडकर आणि स्वच्छंदी आहे. नुकतंच मालिकेत शरद पोंक्षेची एंट्री झाली आणि मालिकेला एक रंजक वळण मिळालं.

नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि देवाशिष, मीरा आणि दुर्वा दिवाळी साजरी करण्यासाठी मामाच्या घरी राहायला आले आहेत. देवाशीषला मीरा आणि आदित्यच्या नात्याचं सत्य जाणून घ्यायचंअसतं पण त्याला काही कामानिमित्त बाहेरगावी जावं लागतं. मधुराचा आदित्य आणि मीरामधील मोमेंट्स बघून संताप होतो. देवाशीषला मीरा आणि आदित्यच्या नात्याबद्दल कळतं आणि त्याला हे हीकळतं कि फक्त मधुरामुळे मीरा देवाशिषशी लग्न करायचा निर्णय घेते. हे सगळं कळल्यावर देवाशिषच्या मनात मीराबद्दलचा आदर वाढतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)