आम्ही तिकिटं लादणार नाही ! तर कार्यकर्त्यांच्या भावना बघूनच उमेदवारी देऊ – सुप्रिया सुळे

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून सुरू झालेल्या रस्सीखेच मध्ये स्पष्टीकरण दिले आहे. “आम्ही तिकिटं लादणार नाही ! तर कार्यकर्त्यांच्या भावना बघूनच उमेदवारी देऊ” , असे त्यांनी स्पष्ट केले. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, उद्यनराजेंच्या उमेदवारीला कोणी विरोध केला याची माहिती माझ्यापर्यंत आली नाही. पण आम्ही तिकिटं लादणार नाही. तर कार्यकर्त्यांच्या भावना बघूनच उमेदवारी देऊ. तसेच आमच्या घरातून मीच लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं देखील त्यांनी सांगितले.

-Ads-

दरम्यान, खासदार उदयनराजेंच्या निमित्ताने राज्यात बहुचर्चित झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरविण्यावरून राष्ट्रवादीच्या बैठकीत रामराजे निंबाळकर व शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाने उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)