आम्ही तालिबान्यांवर विजय मिळवत आहोत 

अफगाणिस्तानच्या अध्यक्षांनी केला दावा 

वॉशिंग्टन: आम्ही तालिबान विरूद्धची लढाई हरत आहोत असा जरी समज काही माध्यमांमध्ये निर्माण झाला असला तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नसून आम्ही त्यांच्यावर विजय मिळवत चाललो आहोत असे अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी म्हटले आहे. आम्ही आता अनेक भूभागांवर आमचा कब्जा प्रस्थापित करीत आहोत असेही त्यांनी आज अमेरिकन नागरीकांपुढील एका बैठकीला संबोधीत करताना सांगितले.

-Ads-

व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे त्यांनी ही माहिती दिली. अलिकडेच तालिबान्यांचे महत्वाच्या ठिकाणांवरील हल्ले वाढले आहेत. पुर्व अफगाणिस्तानात त्यांनी मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत त्यामुळे त्याठिकाणचा बराच भाग पुन्हा अफगाण सरकारच्या ताब्यातून निसटून तालिबान्यांच्या हातात जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे त्या पार्श्‍वभूमीवर त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले की जो पर्यंत आमच्याकडे हवाईदल आणि कमांडो फोर्स आहेत तो पर्यंत आम्हाला तालिबान्यांच्या ताब्यातील प्रदेश पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचा विश्‍वास आहे.

तालिबान्यांशी लढताना गेल्या चार वर्षात अफगाण सुरक्षा दलाचे 28 हजार जवान शहीद झाल्याची माहितीही घनी यांनी दिली ते म्हणाले की तालिबान्यांच्या हल्ल्यांपासून महत्वाच्या ठिकाणांचा बचाव करण्याच्या प्रयत्नात लष्कराची मोठ्याप्रमाणात जीवित हानी झाली आहे. शहीदांचा हा आकडा 28 हजार 529 इतका आहे. हा आकडा आत्तापर्यंत जाहीर करण्यात आला नव्हता परंतु अफगाणि अध्यक्षांनी तो प्रथमच जाहीर केला आहे. याच काळात अमेरिकन लष्कराचेही 58 जण कामी आले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)