आम्ही टीकाकारांना चुकीचे ठरवले – ऍश्‍ले नर्स 

पुणे- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीजने भारताचा 43 धावांनी पराभव करत सामन्यात विजय मिळवल्यानंतर विजयाचा शिल्पकार ठरलेल्या ऍश्‍ले नर्स याने आपली प्रतिक्रीया देताना सांगितले की, आम्हाला एकदिवसीय मालिकेत दुबळा संघ म्हणुन हिणवले जात होते. तसेच आमच्या संघाला नाव ही ठेवले जात होते मात्र या मालिकेत आम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात आमच्या कामगिरीतून आमच्या टिकाकारांना चुकिचे ठरवले आहे.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजच्या विजयात नर्सने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाडयांवर चांगली कामगिरी करत विजयात महत्वाचा वाटा उचलला होता. फलंदाजीमध्ये मोक्‍याच्याक्षणी त्याने 22 चेंडूत तडाखेबंद 40 धावा करत वेस्ट इंडिजला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर गोलंदाजीला आल्यावर त्याने मधल्या षटकांमध्ये दोन बळी घेऊन आपली उपयुक्तता सिद्ध केली. त्यात सलामीवीर शिखर धवन याचा त्याने घेतलेला बळी सामन्याला कलाटणी देणारा ठरला होता.
सामना संपल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत नर्स म्हणाला, “आज आमच्या संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे. जेव्हा आम्ही येथे आलो होतो त्यावेळी कोणालाही आमच्यावर विश्‍वास नव्हता. परंतु, मला वाटते की आम्ही येथे येतानी जे सिद्ध करण्यासाठी आलो होते ते आम्ही आमच्या कामगिरीतून सिद्ध करुन दाखवले आहे. आता आमची नजर माअलिका विजयावर असणार आहे.
हिरवे गवत असलेल्या खेळपट्टीसंबंधी नर्स म्हणाला की, पुणे येथील खेळपट्टी खूप चांगली होती. परंतु थोडी धीम्या स्वरूपाची होती. खेळपट्टीमधे काही धोकादायक वाटत नव्हते. आमच्यकडून शाइ होपने 95 धावांची महत्वपूर्ण खेळी केली तर भारतासाठी विराटने शतक केले. तुम्हाला तुमच्या धावा बनवाव्या लागतात परंतु एकंदरीत ही खळपट्टी उत्तम होती.
नर्स पुढे म्हणला की, प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येतो परंतु, प्रत्येक दिवस हा तुमचा असू शकत नाही. माझ्या संघासाठी मी काहीतरी संधी उपलब्ध व्हावी म्हणून मी चेंडू योग्य ठिकाणी टाकण्याच्या प्रयन्त केला. मी माझे काम चोखपणे करण्यावर भर देतो. मी माझे काम करताना टीकाकारांकडे फारसे लक्ष देत नाही. आणि मला वाटते त्याचाच फायदा मला या सामन्यात झाला आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)