आम्ही जातो अमुच्या गावा

लाखो वैष्णव अलंकापुरीतून परतीच्या वाटेवर : आज सोहळ्याची सांगता

आळंदी– संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराजांचा 723वा संजीवन समाधी सोहळा हा बुधवारी (दि. 5) लाखो वैष्णवांच्या साक्षीने माउली मंदिरात भजन, किर्तन, प्रवचन व इतर धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साही, आनंददायी वातावरणात व पुंडलिक वरदे हरि विठ्ठलाच्या गजरात पडला. तर आज (गुरुवारी) लाखो वैष्णवांनी हरिनामाच्या गजरात माउलींचे दर्शन घेत अंलकापुरीचा निरोप घेत असल्याने अंलकापुरी सुनीसुनी होत आहे.
आळंदीत शुक्रवारी (दि. 30 नोव्हेंबर) पासून सुरू झालेल्या भक्‍तीज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता शुक्रवारी (दि. 7) भक्‍तीमय वातावरणात होत आहे. कार्तिकवारीच्या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्यांनी आळंदीचा परिसर फुलून गेला होता. टाळ मृदंगाच्या अखंड गजरात ज्ञानोबा-तुकारामचा जयघोष करीत वारकऱ्यांनी माउलींच्या चरणी कार्तिक वारीसाठी हजेरी लावत सेवा रुजू केली. यात लाखो वैष्णवांची नगरप्रदक्षिणा आणि झिम्मा-फुगड्यांसह वारकरी खेळाने अलंकापुरी परिसर माउलीमय झाला होता. दरम्यान, आज (गुरुवारी) पहाटे नित्याचे धार्मिक कार्यक्रम उरकल्यानंतर, भाविकांच्या महापूजा सुरू झाल्या. 12 वाजता श्रींना महानैवेद्य झाला त्यानंतर भाविकांसाठी श्रींचे स्पर्श दर्शन सुरू झाले. आज गुरुवार माउलींचावार असल्याने दर्शनबारीचे पाचही मंडप गर्दीने फुलून गेले होते. रात्री 9 ते 12.30 गुरुवारनिमित्त माउली मंदिरात पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाली. यावेळी हजारो भाविकांनी श्रींच्या पालखीचे पुनश्‍च दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. तद्नंतर मोझे यांच्या वतीने हभप गजानन महाराज लाऊडकर यांची किर्तन सेवा झाली. दरम्यान, माउली मंदिरा शुक्रवारी (दि. 7) रात्री 9. 30 ते 12. 30 श्रींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा (छबीना मिरवणूक ) होऊन, नारळ-प्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता होणार असल्याचे प्रमुख व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
मंदिर परिसराच्या स्वच्छतेकामी स्वकाम सेवा मंडळाचे संस्थापक डॉ. सारंग जोशी, अध्यक्ष सुनील तापकीर व महिला अध्यक्षा आशा तापकीर यांचे मार्गदर्शनाखाली धनाजी गावडे,मनसुख लोढा, सुभाष बोराटे, किशोर तुरे, सागर कोतवाल, श्रीरंग पठारे, राजु सस्ते, बाबुराव मोरे, आबा तांगडे, रमेश गावडे, ज्ञानेश्‍वर पठारे, ज्ञानेश्‍व वहिले, लक्ष्मण रासकर, संदीप जाधव, सचिन वहिले, सत्यवान बर्गे, रामचंद्र बटवाल, चंद्रकांत तापकीर, अनंतकुमार दिंडाळ, प्रसन्न लांडे, बाळासाहेब तापकीर, बबन कुरूंद, संजय वाव्हळ, अविनाश मोहिते, सुभाष तांगडे, अशोक हिंगे व किसन सरोदे, महिलांमध्ये जनाबाई सांडभोर, शालन दाभाडे, कमल तापकीर, कांताबाई देवकर व सुरेखा लांडगे आदींनी विशेष परिश्रम घेतले. तर मंदिराबाहेरील परिसरात विश्‍व सामाजिक संस्थेच्या महिला वर्ग व पुरुष वर्गाने स्वच्छतेचे अखेरपर्यंत काम केले.

  • स्वकाम सेवा मंडळाची “स्वच्छते’तून सेवा
    यात्रा काळात माउली मंदिरात विशेष स्वच्छतेची गेली 24 वर्षांची अखंडपणे धुरा सांभाळणारे स्वकाम सेवा मंडळाच्या सदस्यांनी 6/6 तासांच्या दोन शिपमध्ये षुरुष व महिला सेवकांच्या माध्यमातून शनिवार (दि. 1) ते आजपर्यंत संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ ठेवणे, दर्शन बारीतील भाविकांना लाडू-प्रसादाचे, खिचडी, पाणी व चहाचे वाटप करणे, देणगीच्या पावत्या फाडणे, हिशोब ठेवणे तसेच अहोरात्र पेटीत जमा झालेली रक्कम मोजणेकामी मदत करणे आदी कामे स्वंपुर्तीने व विनामुल्य केली. या कालावधीत जालना येथून खास 27 स्वंयसेवकांचे पथक बोलविण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष सुनील तापकीर यांनी सांगितले.
  • तीन दिवसांत 22 टन कचरा उचलला
    जितकी मंदिर स्वच्छता आवश्‍यक आहे, त्याचप्रमाणे शहर व परिसरातील स्वच्छताही भाविक व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असल्याने येथील आरोग्य ठेकेदार गोपाल मोहरकर यांनी देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करीत संपूर्ण यात्रा कालावधीत अहोरात्र जादा कामगार लावून भर यात्रेत देखील गर्दीच्या ठिकाणी वेळोवेळी कचरा उचलून आळंदी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला. एकादशी, द्वादशी व त्रेयदशी या तिन्ही दिवशी कमालीची गर्दी असताना देखील रात्रपाळीत रस्ते स्वच्छ करुन कचरा गोळा करण्यात आला. या तीन दिवसांच्या कालावधीत 20 ते 22 टन कचरा उचलण्यात आला. त्यासाठी 140 कामगार कामावर रुजू करण्यात आले होते. वेळप्रसंगी रात्री 9 ते पहाटे 6 पर्यंत जादा कामगार लावुन आळंदी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी संकल्प गोपाल मोहरकर यांनी केला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)