आम्ही कॉंग्रेसवर अवलंबून नाही 

प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यावरही साधला निशाणा 

पंढरपूर: आगामी निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसकडून आघाडीत सहभागी होण्यासाठी निमंत्रण येत आहेत. पण आम्ही कॉंग्रेसवर अवलंबून नाही, आमच्यासोबत यायचे की नाही हे त्यांनी ठरवावे, असे भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.

-Ads-

पंढरपुर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, सध्या कॉंग्रेस आमच्यावर अवलंबून आहे. म्हणून तर कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासाख्या बड्या नेत्यांचेही आपल्याला निरोप येत असतात. लोकसभेच्या सगळ्या जागा लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढते आहे. त्यामुळे कॉंग्रेसला गरज वाटत असेल तर त्यांनी आमच्याशी हातमिळवणी करावी. लोकसभेच्या अनेक जागांवर द्यायला कॉंग्रेसकडे चांगले उमेदवार नाहीत. तडजोड किंवा समजुतीच्या मार्गाने हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही स्वतंत्र लढू, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

फडणवीसांना नाटके करू द्या 
देवेंद्र फडणवीस हे पुढच्या ऑक्‍टोबरपर्यंतच मुख्यमंत्री पदावर असणार आहेत. तोपर्यंत जी नाटके करायची आहेत ती करा त्यानंतर तुम्ही पदावर नसाल असेही आंबेडकरांनी म्हटले आहे. पुढच्या टर्मला तुम्ही शंभर टक्के मुख्यमंत्री नसाल, असाही दावा त्यांनी यावेळी केला आहे. मनोहर भिडे यांना मिरज दंगलीच्या आरोपातून मुक्त केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाल्यानंतर आंबेडकरानी मुख्यमंत्र्यावर सडकून टीका केली आहे. मिरज दंगलीप्रकरणी सांगलीच्या पोलीस अधीक्षकांनी चांगले रेकॉर्ड केले आहे. त्यामुळे गुन्हे मागे घेण्यास आपला कायमच विरोध असणार आहे. त्यामुळे ऑक्‍टोबरनंतर आम्ही परत चौकशी सुरू करणार असल्याचे ते म्हणाले. पुढच्या वेळी आमचेच सरकार येणार असून तेव्हा भिडेना नक्कीच तुरुंगात पाठवू, असा इशारा त्यांनी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)