आम्ही एकत्र आलो तर सगळ्यांचाच धुव्वा उडवू

रजनीकांत विषयी कमल हसन यांचे प्रतिपादन
चेन्नाई – तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांची दुसरा लोकप्रिय तमिळ अभिनेता कमल हसन यांच्याशी नुकतीच गुप्त भेट झाली. या दोन्ही अभिनेत्यांच्या बैठकीत बरीच चर्चा झाली. या मुलाखतीच्या संबंधात माहिती देताना त्यांनी म्हटले आहे की आम्ही एकत्र काम करावे अशी अनेकांची इच्छा आहे पण अजून तसे ठरलेले नाही पण जर तसे ठरले तर आम्ही सगळ्यांचाच धुव्वा उडवू असे अभिनेते कमल हसन यांनी म्हटले आहे.

एका दूरचित्रवाणी वाहिनीशी बोलताना त्यांनी माहिती दिली. 63 वर्षीय कमल हसन यांनी मक्‍कलनिधी मय्यम नावाचा एक स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केला आहे. रजनिकांत यांनीही स्वत:चा वेगळा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही अभिनेत्यांच्या चर्चेत जर आपण एकमेकांच्या विरोधात लढलो तर एकमेकांची प्रतिष्ठा जपली पाहिजे असा निर्णय झाला आहे. आम्ही एकत्र यावे अशी अनेकांची इच्छा आहे पण त्या विषयी अजून काही ठरलेले नाही असे कमल हसन यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आम्ही एकत्र चित्रपटांमध्ये काम करू शकतो पण त्यामुळे चित्रपटाची प्रॉडक्‍शन कॉस्ट खूपच वाढेल त्यामुळे हे समिकरण व्यवहार्य ठरत नाही आणि तशी रिस्कही कोणी घेणार नाही. राजकारणाच्या बाबतीतही तसेच दिसते आहे असे विधानही त्याने यावेळी बोलताना केले. ते म्हणाले की आपण तामिळनाडुची निवडणूक लढवणार आहोत हे स्पष्ट आहे. पण हे करताना आम्ही नियोजनबद्ध प्रयत्न करणार आहोत असे ते म्हणाले.

आमच्या पक्षाचे धोरण तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. ते लवकरच जाहीर केले जाईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)