‘आम्ही अटक केलेल्या व्यक्‍तीच खरे आरोपी’

सतीश शेट्टी खून प्रकरण : माजी पोलीस अधिकारी आंधळकर यांचा दावा

 सीबीआय राजकीय हेतूने अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप

पुणे – सतीश शेट्टी खून प्रकरणात आम्ही अटक केलेले आरोपीच खरे आरोपी आहेत. याप्रकरणातील खटला सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. सीबीआय अधिकाऱ्याने आम्हाला राजकीय हेतूने अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामीण माजी पोलीस अधिकारी व गुन्ह्यातील आरोपी भाऊसाहेब आंधळकर यांनी केला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची 13 जानेवारी 2010 रोजी तळेगाव दाभाडे येथे धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली होती. तेव्हा आंधळकर पुणे ग्रामीणमध्ये स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक होते. त्यांनी सतीश शेट्टी यांच्याशी वैर असलेल्या लोकांकडे तपास केला. तपासात कै. विजय दाभाडे, प्रमोद वाघमोरे, नवनाथ शेलार, डोंगरू राठोड, श्‍याम दाभाडे यांनी खून केल्याचे आढळले. त्यांना अटक करण्यात आली. या आरोपिंविरुध्द सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. ते अजूनही न्यायप्रविष्ट आहे.

दरम्यान, सतीश शेट्टीचे भाऊ संदीप शेट्टी यांनी उच्च न्यायालयात सोमोटो रिट दाखल केली. उच्च न्यायालय व राज्य सरकारच्या आदेशाने तपास सीबीआयकडे (आकुर्डी) देण्यात आला. तपासाअंती सीबीआयने 11 ऑगस्ट 2014 रोजी योग्य असा पुरावा मिळत नसल्याने “क्‍लोजर रिपोर्ट’ सादर केला होता. याविरुध्द संदीप शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल केला. न्यायालयाने सीबीआयचे (दिल्ली) अधिकारी शुक्‍ला हे तपास करणार असल्याचे सांगितले. संदीप शेट्टी यांची “पूर्वीच्याच टीमचे तपास करावा’, ही मागणी फेटाळून लावत न्यायालयाने त्यांचे पिटीशन डिस्पोज केले. शुक्‍ला यांनी तपास करत भाऊसाहेब आंधळकर व नामदेव कवठाळे यांना अटक केली. त्यांच्यावर खुनाचा गुन्हाही दाखल केला. त्यानंतर त्यांची 19 जुलै 2016 रोजी जामिनावर सुटका झाली. या चार्जशीटविरोधात आंधळकर व कवठाळे यांनी न्यायालयात डिस्जार्ज ऍप्लिकेशन दाखल केले असून ते सध्या न्यायप्रविष्ट आहे. सीबीआय (दिल्ली) 14 जुलै 2016 रोजी दोघांनाही खुनाच्या कलमातून मुक्त केले आहे. तर 13 एप्रिल 2018 रोजी सीबीआय (दिल्ली) मारेकरी व खुनाचा कट रचणाऱ्याची ओळख पटली नसल्याचे सांगत क्‍लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे.

पोलीस अधिकारी अंजीर जाधव यांच्यावर आरोप
सीबीआयच्या पूर्वीच्या टीमचे अंजीर जाधव हे महाराष्ट्र पोलीस दलात प्रतिनियुक्तीवर होते. तसेच ते आमच्या मूळ बार्शी गावाला दोन वर्षे पोलीस स्टेशनला कार्यरत होते. यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक आम्हास राजकीय हेतूने गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याविरोधात आम्ही उच्च व सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे भाऊसाहेब आंधळकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)