आम्हीही तेंव्हाच म्हणू “अच्छे दिन’ आले

पालकमंत्री गिरीश बापट यांचे प्रतिपादन : राजगुरूनगर येथे चासकमान पाणी योजनेचे भूमिपूजन

राजगुरूनगर- मोठा देश मोठे प्रश्‍न अशी देशाची स्थिती आहे. खेडोपाडी अनेक प्रश्‍न आहेत. मात्र, हे प्रश्‍न सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशातील सर्वसामान्य नागरिकांचे दिनदलितांचे प्रश्‍न जेंव्हा सुटतील आणि सर्वसामान्य नागरिक जेंव्हा म्हणेल आता “अच्छे दिन’ आले; त्यावेळी आम्ही ही कामे केली असे म्हणू, असे प्रतिपादन पुण्याचे पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी केले.
चासकमान धरणातून राजगुरूनगर शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेचे भूमिपूजन बापट यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्यअभियंता सुभाष भुजबळ, वरिष्ठ सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तहसीलदार सुचित्रा आमले, जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप तालुका अध्यक्ष अतुल देशमुख, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, उपनगराध्यक्षा वैशाली बारणे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, नगरसेवक रेखा क्षोत्रीय, संपदा सांडभोर, मनोहर सांडभोर, राहुल आढारी, शंकर राक्षे, सचिन मधवे, संदीप सांडभोर, नंदा जाधव, स्नेहलता गुंडाळ, अर्चना घुमटकर, स्नेहल राक्षे, संगीता गायकवाड, सारिका घुमटकर, निलोफर मोमीन, सुरेश कौदरे, रफिक मोमीन, शांताराम घुमटकर, भाजपच्या क्रांती सोमवंशी, कालिदास वाडेकर, राजन परदेशी, रामदास धनवटे, विष्णू बोऱ्हाडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री बापट म्हणाले की, राजगुरुनगरचे प्रश्‍न अद्याप शिल्लक आहेत. हे प्रश्‍न कायम राहतील ते आम्ही सोडवत राहू, आम्ही दमणारे नाहीत, थकणारे नाहीत आणि पळणारे तर त्याहून नाहीच. येथील सर्व प्रश्‍न सोडविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. राजगुरुनगर शहरातील उर्वरित कामे मार्गी लावायची आहेत. भविष्य काळात ताकदीने उभे राहून ही कामे आम्ही मार्गी लावू. राष्ट्रीय महामार्गाचे देशात जाळे निर्माण करण्याचे काम भाजपने केले आहे, मागील 50 वर्षांत दिवसागणिक दीड किमीचा रस्ता देशात होत होता. मात्र, नितीन गडकरी या खात्याचे मंत्री झाल्यानंतर आता 50 किमीचे रस्ते दिवसागणिक बांधले जात आहेत. या देशात महिलांच्या प्रश्‍नांकडे लक्ष दिले जात नाही. तीचे आरोग्य, तीचे संरक्षण कोण करणार? असा सवाल करीत हे प्रश्‍न आम्ही मोठ्या हिमतीने करीत आहोत. ज्याची सुरुवात आम्ही खेड्यापाड्यातून करीत आहोत, असे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केले. सूत्रसंचालन नरेंद्र गायकवाड यांनी तर उपनगराध्यक्षा वैशाली बारणे यांनी आभार मानले.

 • राजगुरूनगर ग्रामपंचायतीची नगरपरिषद झाली आणि लगेचच निवडणूक लागली. या निवडणुकीत प्रचारात पालकमंत्री गिरीश बापट यांनी शहराचा पाणी प्रश्‍न सोडविण्याचे नागरिकांना वचन दिले होते. त्याची आज प्रत्यक्ष वचनपुर्ती झाली आहे. 20 वर्षांचा प्रलंबित प्रश्‍न आता सुटणार आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी वीज कनेक्‍शन, वीज मीटरसाठी सुमारे सव्वासात कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. पूर्ण वीज शक्‍तीने योजना सुरू ठेवण्यासाठी 12 किमी अंतरावर वेताळे येथे वीज फिडर करण्यासाठी 2.18 कोटी निधीची आवश्‍यकता आहे. 40 लाख शुद्धीकरण प्रकालापासाठी असा 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा.
  – शिवाजी मांदळे, नगराध्यक्ष, राजगुरूनगर नगर परिषद
 • पुणे ते राजगुरूनगरपर्यंत मेट्रो करा
  हुतात्मा राजगुरू राष्ट्रीय जन्मस्थळ स्मारकाच्या 87 कोटीच्या आराखड्याला मंजुरी मिळावी, पुणे ते राजगुरुनगरपर्यंत मेट्रो करावी. पुणे ते राजगुरुनगरपर्यंत प्रवास करण्यासाठी दोन बस नव्याने देण्याची व्यवस्था करावी. भाजपने शहराच्या विकासासाठी मोठा निधी दिल्याने आगामी निवडणुकांमध्ये भाजपला शहरातील नागरिक साथ देतील, असा विश्‍वास नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी व्यक्‍त केला.
 • .. त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
  राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकाच्या कामासाठी अर्थमंत्री संवेदनशील आहेत. महिनाभरात बैठक घेवून या आराखड्याला मान्यता देण्यात येइल. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. येथील हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी नमूद केले.
 • कॉलेजमध्ये चिठ्या देण्याचा सराव असावा
  शिवाजी मांदळे तुम्ही कितीही पैसे मागा. तुम्ही मागायला दमतो की, आम्ही आम्ही द्यायाला दमतो हेच आता पाहू. राजगुरूनगरच्या विकासासाठी किती निधी मागायचा यासाठी खिशातून अनेक चिठ्या भाषण सुरू असताना निघत होत्या. मी पाहत होतो. या बाबाने आता खिशात किती चिठ्या आणल्या. ते कॉलेजला असताना बहुतेक त्यांना चिठ्या देण्याचा सराव असावा, असे पालकमंत्री बापट यांनी मिष्किलपणे म्हणातच कार्यक्रमात एकच हस्यकल्लोळ उठला होता.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)